आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाकिस्तान:सारे चोर एकत्र आले; विरोधकांच्या आघाडीवर इम्रान खान यांचा आरोप, संयुक्त आघाडीमुळे बिथरले सरकार

इस्लामाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याने पंतप्रधान इम्रान खान चिडले आहेत. स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार इम्रान खान यांनी म्हटले आहे की, ही विरोधी पक्षांची नव्हे तर सर्व चोरांची एकता आहे. सर्व बेरोजगार नेते एकत्र आले आहेत. हे लोक सभा, रॅली काढताहेत. मात्र कायदा मोडल्यास थेट जेलमध्ये जातील. ही जेल व्हीआयपी जेल नसेल, सर्वसामान्य कैद्यांची असेल. विरोधकांचा मुद्दा लाेकशाही नव्हे तर भ्रष्टाचाराला वाचवणे आहे. देश प्रगती करत आहे, मात्र विरोधकांना सरकार पाडण्याची घाई आहे.

वकिलांच्या संघटनेच्या एका कार्यक्रमात इम्रान खान म्हणाले की, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना लष्कराला पंजाब पोलिस करायचे आहे. जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा सर्व संस्थांवर नियंत्रण मिळवतात. आयएसआयवर नियंत्रणाचा प्रयत्न करतात तेव्हा भांडण होते. यामुळेच कोणत्याही लष्करप्रमुखाचे शरीफ यांच्याशी जमले नाही. मात्र, आमच्या सरकारला लष्करापासून काहीच अडचण नाही. लष्कर प्रत्येक ठिकाणी सरकारसोबत उभे आहे. दरम्यान, विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पक्षाचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी सांगितले की, पाकिस्तान इम्रान खान यांचे ओझे सहन करू शकत नाही.

करड्या यादीतून बाहेर येणे पाकसाठी अवघड
पाकिस्तानसाठी एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर येणे अवघड होत चालले आहे. एफएटीएफच्या आशिया-प्रशांत गटाने (एपीजी) पाकिस्तानला ‘एनहान्स्ड फॉलोअप’ यादीत ठेवले आहे. एपीजीने १२ पानांच्या अहवालानुसार पाकने अतिरेक्यांचा निधी रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. यामुळे त्याची पुन्हा रेटिंग व्हायला नको. पाकने एफएटीएफच्या ४० शिफारशींपैकी केवळ दोनवरच अंमलबजावणी केली.