आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:लाहोरमध्‍ये जमावबंदीच्या वृत्तानंतर पीटीआयकडून कार्यकर्त्यांना अटक होत असल्याचा आरोप

लाहोर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या लाहोर शहरात कलम १४४ लागू केल्याच्या वृत्तानंतर बुधवारी पाकिस्तान-तहरिक-ए इन्साफ(पीटीआय) पक्षाने आपल्या शांत कार्यकर्त्यांना अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. जमावबंदी आदेशांतर्गत लाहोरमध्ये सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे.

पंजबाच्या काळजीवाहू सरकारने सोशल मीडियावर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने सर्व प्रकारच्या मेळाव्यावर, मोर्चावर बंदी घातली आहे. त्यासाठी सुरक्षेला गंभीर धोका असल्याचे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देण्यात आले आहे. पीटीआय वीजटंचाईच्या मुद्द्यावर बुधवारी मोर्चाचे आयोजन करणार होता. पीटीआयचे नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री अझहर यांनी हुकूमशाही पद्धतीने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात असल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...