आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटर-फेसबुकनंतर आता गुगलमध्येही कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार:सुंदर पिचाई 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारीत

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेटा, अॅमेझॉन, ट्विटरनंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचार्‍यांच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. याअंतर्गत ‘खराब कामगिरी करणाऱ्या’ कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

एका अहवालानुसार, गुगलने कर्मचाऱ्यांसाठी नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स प्लॅन बनवला आहे. यानुसार चांगली कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापन कामावरून काढून टाकू शकेल. या प्रणालीमध्ये व्यवस्थापक या कर्मचाऱ्यांसाठी रेटिंग वापरू शकतात. जेणेकरुन त्यांचे बोनस आणि इतर अनुदाने थांबवू शकतील.

अल्फाबेटमध्ये सुमारे 1,87,000 कर्मचारी काम करतात. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसी) फाइलिंगनुसार, अल्फाबेटवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सरासरी पगार 2,95,884 डॉलर आहे. 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत यूएस अर्थव्यवस्थेवरील संकट आणि मंदीमुळे अल्फाबेटचा नफा 27 टक्क्यांनी घटून $13.9 अब्ज झाला आहे. तर महसूल 6 टक्क्यांनी वाढून $69.1 अब्ज झाला आहे. अल्फाबेटला 20 टक्के अधिक कार्यक्षम बनवल्या जाईल, असे अलीकडेच अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते. या वक्तव्याद्वारे त्यांनी छाटणीचे संकेत दिले होते.

अमेरिकन कंपन्यांनी विस्तार थांबवला

चलनवाढ, मंदावलेली अर्थव्यवस्था, अमेरिका आणि युरोपमधील मंदीची भीती आणि युक्रेन-रशिया युद्ध या चिंतेमुळे कंपन्या त्यांचा विस्तार थांबवत आहेत. मेटा, ट्विटर आणि टेस्लासह काही कंपन्यांनीही यूएस मार्केटमधील अनिश्चिततेच्या दरम्यान नोकरभरती कमी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...