आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये आगळी परंपरा:शाही परिवाराच्या दहा लाख मधमाशांनाही कळवले, आता तुमचे राजे चार्ल्स

लंडन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर आता चार्ल्स तृतीय हे तुमचे राजे झाले आहेत. ते चांगले आहेत’ अशा आशयाचा संदेश शाही परिवाराच्या दहा लाख मधमाशांना देण्यात आला. नव्या राजांना चांगली वागणूक द्यावी आणि मधनिर्मितीचे कार्य सोडू नये, असा त्यामागील उद्देश आहे. राजा किंवा राणी बदलल्याची माहिती दिली नाही तर या मधमाशा नाराज होतात, मधनिर्मिती सोडून देतात किंवा पोळे सोडून निघून मृत्यू पावतात, असे मानले जाते. म्हणूनच अनेक वर्षांपासून ही परंपरा शाही परिवारात जोपासण्यात येते. बकिंगहॅम पॅलेस, क्लेरेन्स हाऊस येथील मधमाशांचे संगोपन करणारी व्यक्ती हा संदेश पोहोचवते. ही परंपरा इंग्लंडमध्ये सर्वांना परिचित आहे.

मधमाशांचे संगोपन करणारे ७९ वर्षीय जॉन चॅपेल व त्यांची पत्नी कॅथ म्हणाल्या, मधमाशांच्या पोळ्यावर थापटून संदेश द्यायचा असतो, अशी परंपरा आहे. बकिंगहॅम पॅलेसमधील उद्यान संरक्षकाचा ई-मेल आला. त्यांना आधी मधमाशांचा त्रास होत असावा असे वाटले. परंतु मधमाशांचे योग्य संगोपन करण्यासाठी त्याची जबाबदारी देण्याची त्यांची इच्छा असल्याचे संरक्षकांना भेटल्यावर समजल्याचे या जोडप्याने स्पष्ट केले. अशा प्रकारची अनोखी परंपरा ब्रिटनच्या राजघराण्यात शतकानुशतके चालत आली आहे. इंग्लंडमधील नागरिकांनाही त्याबद्दल उत्सुकता वाटते.

मधमाशांच्या पेट्यांवर लावला काळा कपडा
जॉन म्हणाले, ३० वर्षांहून जास्त दिवसांपासून शाही परिवाराच्या मधमाशांची देखभाल करत आहे. मधमाशांना संदेश देण्यासाठी त्यांच्या पेट्यांवर काळा कपडा बांधला जातो. त्यानंतर हळुवारपणे प्रत्येक पेटीवर जाऊन संदेश दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...