आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Although Biden Has Been In The Lead Since The Beginning Of The Survey, Chinese Hats And Masks Of Trump's Photograph Are The Most Sold.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सर्व्हेत बायडेन यांची सुरुवातीपासून आघाडी असली तरी ट्रम्प यांच्या छायाचित्राच्या चिनी टोप्या-मास्कचीच अधिक विक्री

जियोवान्नी रसोनेलो/कीथ ब्रॅडशरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेमोक्रॅटिक समर्थक स्वखर्चाने घरीच बनवताहेत बॅनर्स-पोस्टर्स, इतरांनाही वाटताहेत...

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष निवडणूक होत आहे. आतापर्यंत सर्वेक्षणात डेमोक्रॅटिक बायडेन आघाडीवर दिसत असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तयार केलेली अन् ज्या चीनला ट्रम्प यांनी प्रचारात अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू संबोधले त्या चिनी बनावटीची गॅजेट्स जास्त विकली जात आहेत. हे आश्चर्यकारक मानले जात आहे. चीनमधील जगातील सर्वात मोठा गॅजेट्सचा घाऊक बाजार यिवू शहरात आहे. येथील एका कारखान्यात काम करणाऱ्यांना या वेळीही ट्रम्पच जिंकतील असे वाटते. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेसाठी वाटल्या जाणाऱ्या प्रचाराच्या वस्तू या कारखान्यात तयार होत आहेत हे कदाचित यामागचे कारण असावे. एवढेच नव्हे तर प्लास्टिकचे डायनासोर व ‘किस माय बेस’ या घोषणेसह ट्रम्प यांचे छायाचित्र असलेल्या टोप्याही अमेरिका व चीनमध्ये खूप विकल्या जात आहेत. येथील दुकानदारांनुसार, बायडेन यांचे छायाचित्र असलेल्या टोप्या इत्यादींची विक्री नावालाही झाली नाही. बायडेन यांचे छायाचित्र असलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी वर्षभरात केवळ एक खरेदीदार आल्याचे यिवूतील १०० दुकानांपैकी एका दुकानदाराने सांगितले.

२०१६ च्या निवडणुकीत अमेरिकेच्या बॅटल ग्राउंड राज्यांमध्ये क्लिंटन यांचे बॅनर व कटआऊट सर्वसामान्यांच्या घरातून गायब होते. या सर्व राज्यांत ट्रम्प यांची पोस्टर्स व त्यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही घोषणा गाजली होती. यंदा या राज्यांत बायडेन यांचे पोस्टर-बॅनर प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या घरात दिसत आहेत. काही घरांमध्ये दोघांचीही पोस्टर्स दिसतात. या वेळीही डेमोक्रॅटिक पक्षाने बॅनर-पोस्टरवर अधिक खर्च केलेला नाही. बायडेन समर्थकांनी स्वखर्चाने घरीच पोस्टर-बॅनर्स बनवून लावली, इतरांनाही वाटली.

६५ वर्षे वयावरील दोन तृतीयांश लोकांनी आधीच केले मतदान

फ्लोरिडा विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्रा. डॅनियल स्मित सांगतात, ६५ वर्षांवरील दोन तृतीयांश लोकांनी आधीच मतदान केले आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दबदबा असलेल्या भागातही हीच स्थिती आहे. मात्र, या सर्व ज्येष्ठांनी २०१६ प्रमाणे या वेळीही ट्रम्प यांनाच मत दिले की यातील काही वाटा बायडेन यांच्या पारड्यात गेला हे सांगणे कठीण आहे. ३ नोव्हेंबरला समर्थक मोठ्या संख्येने बाहेर पडावेत याची काळजी ट्रम्प यांना घ्यावी लागेल.