आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Alzheimer’s Lost Memory, But The Wife Remembered; Reunited After 12 Years Of Watching Wedding Scenes On TV; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:अल्झायमरने स्मरणशक्ती गेली, मात्र पत्नी लक्षात राहिली; टीव्हीवर लग्नाचे दृश्य बघून 12 वर्षांनी पुन्हा एक झाले

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत दिसली पती-पत्नीच्या अनोख्या नात्याची कहाणी

अमेरिकेतील कनेक्टिकटचे पीटर मार्शल (५६) यांना अल्झायमर आहे. २००९ मध्ये त्यांचे लिसासोबत लग्न झाले होते. मात्र, आजारामुळे त्यांचे लग्न झाल्याचा विसर पडला. मात्र त्यांची खूपच काळजी घेणारी लिसा आहे हे त्यांच्या लक्षात राहिले. गेल्या एप्रिलमध्ये पीटर घरी टीव्ही पाहत होते. त्यात लग्नाचे दृश्य होते. त्याच क्षणी पीटरने ठरवले की त्यांच्या आवडत्या मैत्रिणीशी लग्न करायचे. त्यांनी पुन्हा लिसाला मागणी घातली आणि नुकतेच दोघे एकत्र आले. विशेष म्हणजे पीटरच्या अजूनही लक्षात नाही की, लिसासोबत त्यांचे आधीही लग्न झाले होते. २००१ मध्ये पीटर आणि लिसा पेन्सिल्वेनियात शेजारी राहायचे. दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर दोघे जवळ आले. नंतर पीटर कामासाठी कनेक्टिकटला राहायला आले.

मात्र दोघे आठ वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहिले. १३ ऑगस्ट २००९ मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र, २०१७ च्या प्रारंभी पीटर विसराळू झाले. त्यांना शब्द आठवायलाही अडचणी येऊ लागल्या. काही दिवसांनी त्यांना अल्झायमर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्मरणशक्ती गेल्यानंतरही पीटरला लिसा लक्षात राहिली. २०२० मध्ये लिसाने तिचे काम सोडले आणि ती पूर्णवेळ काळजी घेऊ लागली. लिसा म्हणते, २०२१ च्या सुरुवातीला एके दिवशी पीटर टीव्ही पाहत होते.त्यात लग्नाचे दृश्य होते. त्याच क्षणी पीटरने ठरवले की त्यांच्या आवडत्या मैत्रिणीशी लग्न करायचे. त्यांनी पुन्हा लीसाला मागणी घातली आण्िा नुकतेच दोघे एकत्र आले. विशेष म्हणजे पीटरच्या अजूनही लक्षात नाही की, लीसासोबत त्यांचे आधीही लग्न झाले होते.

२००१ मध्ये पीटर आणि लीसा पेन्सिल्वेनियात शेजारी रहायचे. दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर दोघे जवळ आले. नंतर पीटर कामासाठी कनेक्टिकटला रहायला आले मात्र दोघे आठ वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहिले. १३ ऑगस्ट २००९ मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र, २०१७ च्या प्रारंभी पीटर विसराळू झाले. त्यांना शब्द आठवायलाही अडचणी येऊ लागल्या. काही दिवसांनी त्यांना अल्झायमर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्मरणशक्ती गेल्यानंतरही पीटरला लीसा लक्षात राहिली. २०२० मध्ये लीसाने तिचे काम सोडले आणि ती पूर्णवेळ काळजी घेऊ लागली.

लीसा म्हणते, २०२१ च्या सुरुवातीला एके दिवशी पीटर टीव्ही पहात होते. अचानक उभे राहिले आणि म्हणाले, चल करून टाकू. मी विचारले, काय? त्यांनी टीव्हीकडे इशारा केला. मी विचारले, तुला लग्न करायचे आहे का? त्याने हो म्हटल्यावर मीदेखील लगेच तयार झाले. त्यांच्या लग्नाची तयार लीसाची मुलगी सारा (३२) हिने केली. तिने सर्वांशी बोलणे केले, पाहुण्यांना बोलावले आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत पीटर आणि लीसा पती- पत्नी झाले.

मी नशीबवान, एकाच व्यक्तीसोबत दोनदा लग्न : लिसा
लीसा सांगते, २०१७ मध्ये पीटरची स्मरणशक्ती जाऊ लागली. त्यांना अनेक गोष्टींचा विसर पडला, मात्र मी लक्षात होते. मी सतत त्यांच्या संपर्कात होते. त्यांना आजही माहिती नाही की त्यांची पहिली पत्नी आहे. मी खूप नशीबवान आहे कारण मी दोन वेळा लग्न केले, तेही एकाच व्यक्तीशी.

बातम्या आणखी आहेत...