आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) पृथ्वी शेजारच्या लाल ग्रहाची म्हणजे मंगळ ग्रहाची काही विहंगम छायाचित्रे सार्वजनिक केली आहेत. 4 फोटोंच्या या कोलाजमधील प्रत्येक फोटो वेगवेगळा आहे. पण, ते लाल ग्रहावरील एकच वेळ दाखवत आहेत. गत आठवड्यात शेअर करण्यात आलेली ही छायाचित्रे मंगळाभोवती घिरट्या घालणाऱ्या एका अंतराळ यानाने काढली आहेत. त्यात मंगळावरील सकाळचे दवबिंदू दिसून येत आहेत.
नासाने 5 मे रोजी लिहिले की, मंगळाच्या पृष्ठभागावर दवबिंदू, जो मुख्यतः कार्बन डाय ऑक्साईडने तयार झाले आहे, छायाचित्रांत निळ्या व पांढऱ्या रंगात दिसून येत आहे. स्पेस एजंसीने सांगितले की, ही छायाचित्रे ओडिसी ऑर्बिटरवर लावण्यात आलेल्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टम (थिमिस) कॅमेऱ्याने घेतली आहेत. ओडिसीला 2001 मध्ये लाँच करण्यात आले आहे. नासाचे हे सर्वात लांब मार्स मिशन आहे.
अंतराळयानावरील कॅमेरा अप्रतिम छायाचित्रे खेचतो
हे मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर्स 'स्पिरिट' व 'ऑपॉर्च्युनिटी'सह मंगळावरील रोव्हर्स व लँडर्ससाठी कम्युनिकेशन रिले म्हणून काम करते. हे अंतराळ यान थिमिस या इन्फ्रारेड, तापमान-संवेदनशील कॅमेऱ्याच्या मदतीने मंगळाची छायाचित्रे देखील काढू शकते. नासाने सांगितले की, थिमिस मानवी डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाश व उष्णता-संवेदनशील इनफ्रारेड या दोन्ही प्रकारात छायाचित्रे खेचू शकते.
छायाचित्रांत दिसले दवबिंदू
आतापर्यंत कोणत्याही अंतराळ यानाने मंगळ ग्रहावरील दवबिंदूंची अशी विहंगम छायाचित्रे काढली नाहीत. पण, थिमिसच्या मदतीने या यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर साचलेल्या दवबिंदूंचे आश्चर्यकारक छायाचित्रे काढली आहेत. त्यामुळे प्रथमच पृथ्वीवासियांना मंगळावरील विलोभणीय सकाळचे दृश्य पाहता आले आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या सिल्व्हेन पिकक्स यांनी सांगितले की, ओडिसीच्या सकाळच्या कक्षेतून सुंदर छायाचित्रे बाहेर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये आपण सूर्याची एक लांब सावली पाहू शकतो. जी मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पसरलेली दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.