आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Amazon Company's Announcement Of 18 Thousand Employee Cuts, Reduced Investment In Technology, Increased Crisis

झटका:अ‍ॅमेझॉन कंपनीची 18 हजार कर्मचारी कपातीची घोषणा, तंत्रज्ञानात घटली गुंतवणूक, संकट वाढले

लॉस एंजलिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेक आणि सॉफ्टेवअर पुरवठादार कंपन्यांसाठी वर्षाची सुरुवात चांगल राहिली नाही. अ‍ॅमेझॉनने गुरुवारी आर्थिक अनिश्चिततेचा हवाला देत एकूण कर्मचाऱ्यांपैकी १८,००० जणांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेच्याच क्लाउड आधारित सॉफ्टवेअर कंपनी सेल्स फोर्सनेही १०% कर्मचारी कपातीची तयारी केली आहे. कंपनीत ८० हजार कर्मचारी आहेत. बहुतांश जणांची कोरोनाकाळात भरती केली होती. अ‍ॅमेझॉनमध्ये कपातीची प्रक्रिया १८ जानेवारीपासून होईल. इथे ३.५० लाख कर्मचारी आहेत. म्हणजे ६% जणांची कपात होईल, असे कंपनीचे सीईओ अँडी जेसी म्हणाले.

भारतात १० हजार कर्मचारी
अ‍ॅमेझॉनच्या या कपातीमुळे भारतातील त्यांचे कर्मचारी प्रभावित होतील. भारतात अ‍ॅमेझॉन कंपनीत १०,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. अॅमेझॉननुसार, ज्यांची कपात केली जाईल त्यांना २४ तासांपूर्वी नोटीस व अतिरिक्त वेतन दिले जाईल. तसेच आरोग्य विमा आणि नवी नोकरी शोधण्यात त्यांची मदतही केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...