आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीला इटलीत ९,७५० कोटी रुपयांचा (१.३ अब्ज डॉलर) दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीवर युरोपात आपल्या बाजारातील मक्तेदारीचा दुरूपयोग करून लहान विक्रेत्यांची किंवा प्रतिस्पर्ध्यांची कोंडी केल्याचा आरोप आहे.
इटलीच्या अँटी ट्रस्ट रेग्युलेटरी ॲथॉरिटीने हा दंड ठोठावला आहे. ॲथॉरिटीने गुरुवारी म्हटले की, लहान प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी ॲमेझॉनने थर्ड पार्टी विक्रेत्यांना फायदा करून दिला. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या वस्तूंची विक्री आणि पुरवठ्यावर परिणाम करावा यासाठी त्यांना आपल्या लॉजिस्टिक सेवा आणि पुरवठा यंत्रणेचा वापर करू दिला. इटलीत ही ॲथॉरिटी कुठल्याही कंपनीवर त्याच्या एकूण महसुलाच्या १० टक्क्यांपर्यंत दंड ठोठावू शकते. ॲमेझॉनने हायकोर्टात अपील करणार असल्याचे म्हटले आहे. इटलीत ॲथॉरिटीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता येण्याची कायदेशीर तरतूद आहे. कोर्ट दंडाची रक्कम कमी किंवा जास्त करण्याबाबत निर्णय घेऊ शकते. इटलीत २०१९ मध्ये थर्ड पार्टी विक्रेत्यांची ऑनलाइन जेवढी विक्री झाली होती त्यापैकी ७० टक्के फक्त ॲमेझॉनवर झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.