आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीनामा:अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेची मागितली माफी, रशियाला शस्त्र पुरवठा केल्याचा केला होता आरोप

जोहान्सबर्ग16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकन राजदूत रुबेन ब्रिगेटी यांनी तेथील सरकारची बिनशर्त माफी मागितली आहे. ब्रिगेटी यांनी 11 मे रोजी एक निवेदनाद्वारे दक्षिण आफ्रिकेने रशियाला शस्त्रे दिल्याचा आरोप केला होता. गतवर्षी 6 ते 8 डिसेंबरदरम्यान केपटाऊनमध्ये एका रशियन जहाजावर शस्त्रास्त्रे व दारूगोळा लोड करण्यात आला होता, असा दावा ब्रिगेटी यांनी केला होता.

त्यावर दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेच्या राजदूताला बोलावून रशियाला शस्त्रे विक्री केल्याची कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अध्यक्षीय कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात अमेरिकेच्या राजदूताचे आरोप फेटाळण्यात आले. या आरोपांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा अमेरिकेने सादर केलेला नाही, असा दाखलाही या प्रकरणी देण्यात आला.

छायाचित्रात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा व अमेरिकन राजदूत रुबेन ब्रिगेटी दिसून येत आहे.
छायाचित्रात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा व अमेरिकन राजदूत रुबेन ब्रिगेटी दिसून येत आहे.

अमेरिकन राजदूत म्हणाले- दोन्ही देशांतील मजबूत भागीदारी कायम
ब्रिगेटी यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर ते सोशल मीडियावर म्हणाले - माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. या प्रकरणी चुकीची माहिती पसरवण्यात आली. मला ही चूक सुधारण्याची संधी मिळाली . त्यासाठी मी कृतज्ञ आहे. दोन्ही देशांमधील मजबूत भागीदारी यापुढेही कायम राहील. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचे कॅबिनेट मंत्री खुम्बुद्झो नत्शावेनी म्हणाले – अमेरिका आम्हाला अशा प्रकारे धमकावू शकत नाही. रशियावर निर्बंध लादण्याचा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी आम्हाला त्यात ओढू नये.

हे छायाचित्र रशियाचे अध्यक्ष पुतिन व दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आहे.
हे छायाचित्र रशियाचे अध्यक्ष पुतिन व दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आहे.

पुतीन यांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली
या संपूर्ण घटनाक्रमात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर संवाद झाला. तत्पूर्वी, अमेरिकेनेही या आरोपांवर प्रतिक्रिया दिली होती. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले - अमेरिका या आरोपांच्या खोलात जात नाही. पण ही गंभीर बाब आहे. अमेरिकेने सुरुवातीपासूनच इतर देशांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देऊ नये असा इशारा दिला होता.

रशिया-युक्रेन युद्धावर दक्षिण आफ्रिकेची निष्पक्ष भूमिका
गत 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाप्रकरणी यूएनमध्ये झालेल्या मतदानात दक्षिण आफ्रिकेने तटस्थ भूमिका घेतली होती. दक्षिण आफ्रिकेने अनेक महिन्यांपासून हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याच्या बाजूने विधाने केली आहेत. त्यामुळे त्याने रशियाला शस्त्रास्त्रे पुरवली तर त्याला देशवासियांसह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला उत्तर द्यावे लागले असते.

बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील बरेच लोक रशियाच्या बाजूने आहेत. कारण 20 व्या शतकात व्हाईट मायनॉरिटी रूल विरुद्धच्या युद्धात सोव्हिएत युनियनने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, अमेरिकेसोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाल्यास त्याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.