आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिकेची चीनवर कठोर कारवाई:72 तासात ह्यूस्टनमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश

ह्यूस्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. मंगळवारी रात्री अमेरिकेच्या ह्यूस्टनमधील चीनच्या वाणिज्य दूतावासात हजारो डॉक्यूमेंट्स जाळण्यात आले. या घटनेच्या काही तासानंतर अमेरिकेने चीनला 72 तासांच्या आत दूतावास बंद करण्यास सांगितले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने याबाबत माहिती दिली आहे.

दूतावासात नेमके काय झाले ?

मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास (लोकल टाइम) ह्यूस्टनमधील चीनी कॉन्स्युलेटच्या मागील बाजूस आग लागलेली दिसली. आसपासच्या नागरिकांनी अग्नीशमन विभागाला याची माहिती दिली. काही मिनीटातच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांना आत जाऊ दिले नाही. काही वेळानंतर आग शांत झाली.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

कॉन्स्युलेटच्या जवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ काढला. यात स्पष्ट दिसत आहे की, फायबरच्या कॅरेट्समध्ये कागदपत्र आणून त्यांना आग लावली जात आहे. अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आत जाण्यास रोखले आणि घटनेबाबत दूतावासही काही सांगण्यात तयार नाही.

कोणता संशय व्यक्त होत आहे ?

सोशल मीडियावर संशय व्यक्त होत आहे की, काही संवेदनशील माहिती असलेल्या कागदपत्रांना जाळण्यात आले आहे. दोन्ही देशातील संबंध आणि सरकारच्या हरकतीमुळे संशय बळावत आहे. यानंतर अमेरिकेने कडक कारवाई करत 72 तासात दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.