आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • America City Of Newark; Canceled Sister City Agreement With Kailasa | Suzanne Garofalo | America Swami Nityananda|

स्वामी नित्यानंदांच्या कैलासाचा विशेष दर्जा रद्द:अमेरिकेच्या नेवार्क शहराने मानले होते सिस्टर सिटी; आता म्हणाले - करार फसवा

नेवार्क25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवार्कने कैलासासोबत झालेला सिस्टर सिटीचा करार 18 जानेवारी रोजी रद्द केला होता.  - Divya Marathi
नेवार्कने कैलासासोबत झालेला सिस्टर सिटीचा करार 18 जानेवारी रोजी रद्द केला होता. 

अमेरिकेच्या नेवार्क शहराने भारताच्या कुख्यात स्वामी नित्यानंद याच्या कैलासा नामक देशासोबत केलेला सिस्टर सिटीचा करार रद्द केला आहे. नेवार्कच्या प्रेस सचिव सुजैन गॅरोफलो यांनी हा करार केल्याचा पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या - कैलासाची वस्तुसथिती समजल्यानंतर लगेचच आम्ही हा करार रद्द केला. हा करार धोक्याने करण्यात आला होता.

अमेरिकेच्या नेवार्क शहराने गत 11 जानेवारी रोजी केलासासोबत सिस्टर सिटीचा करार केला होता. त्यानंतर नित्यानंद यांनी अमेरिकेने आपल्या देशाला मान्यता दिल्याचा दावा केला होता. नित्यानंद यांनी या कराराशी संबंधित समारंभातील काही फोटोही फेसबूकवर शेअर केले होते.

हे छायाचित्र नेवार्क व कैलासामध्ये 11 जानेवारी रोजी झालेल्या कराराचे आहे.
हे छायाचित्र नेवार्क व कैलासामध्ये 11 जानेवारी रोजी झालेल्या कराराचे आहे.

18 जानेवारी रद्द झाला करार

नेवार्कचे काउंसिलमन लुइस क्विंटाना यांनी गत 18 जानेवारी रोजी हा करार रद्दबातल करण्याचा एक प्रस्ताव सादर केला. क्विंटाना म्हणाले - कोणत्याही देशाला सिस्टर सिटी करारात सहभागी होण्यासाठी तेथील मानवाधिकारांचे योग्यपणे पालन करावे लागते. त्यामुळे आम्ही वादात अडकलेल्या व मानवी हक्कांचे पालन होत नसलेल्या कोणत्याही देशाचा समावेश करू शकत नाही. हा करार एक चूक होती. ती आम्ही करू शकत नाही. त्यानंतर हा ठराव मंजूर करून नेवार्कने हा करार रद्द केला.

या करारांतर्गत नेवार्कने कैलासाला सिस्टर सिटीचा दर्जा दिला होता.
या करारांतर्गत नेवार्कने कैलासाला सिस्टर सिटीचा दर्जा दिला होता.
या छायाचित्रात कैलासाची प्रतिनिधी विजयप्रिया व नेवार्कचे प्रतिनिधी दिसून येत आहेत.
या छायाचित्रात कैलासाची प्रतिनिधी विजयप्रिया व नेवार्कचे प्रतिनिधी दिसून येत आहेत.

UN च्या बैठकीत दिसली होती कैलासाची प्रतिनिधी

गत 24 फेब्रुवारी रोजी जिनेव्हातील UN च्या बैठकीत विजयप्रिया नामक नित्यानंद यांच्या कैलासा या कथित देशाची प्रतिनिधी दिसली होती. या बैठकीत तिने आर्थिक व सोशल राइट्ससह शाश्वत विकासावरील चर्चेत सहभाग नोंदवला होता. विजयप्रिया म्हणाली होती -नित्यानंद यांना त्यांचे जन्मस्थान असणाऱ्या भारतात हिंदू विरोधी लोक त्रास देत आहेत. या विधानानंतर खळबळ माजल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरणही दिले होते. ​​​​​​​

2020 मध्ये नित्यानंद यांनी कैलासा नामक स्वतःचे एक स्वतंत्र बेट वसवल्याचा दावा केला होता.
2020 मध्ये नित्यानंद यांनी कैलासा नामक स्वतःचे एक स्वतंत्र बेट वसवल्याचा दावा केला होता.

2019 मध्ये भारतातून केले होते पलायन

नित्यानंद यांच्या एका शिष्येने 2010 मध्ये त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तपासानंतर 2019 मध्ये गुजरात पोलिसांनी मुलांचे अपहरण करून नित्यानंद यांच्या आश्रमात ठेवले जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून 2 जणांना अटक केली. यामुले 2019 मध्ये नित्यानंद याने देशातून पलायन केले. 2020 मध्ये त्याने कैलासा नामक स्वतःचा स्वतंत्र देश स्थापन केल्याचा दावा केला. पण या द्वीपवजा देशाला अजून कोणत्याही देशाने मान्यता दिली नाही.

स्वामी नित्यानंद यांच्या कैलासासंबंधीची खालील बातमी वाचा...

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत 'कैलासा'ची एंट्री:फरार झालेल्या स्वामी नित्यानंदाने स्थापन केला देश, भारताकडून छळ होत असल्याचा आरोप

बलात्काराचा आरोपी नित्यानंदने आता भारतावर आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. बलात्काराच्या आरोपी नित्यानंदने स्थापन केलेल्या देश कैलासने नुकत्याच जीनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भाग घेतला होता. कैलासाच्या प्रतिनिधीने बैठकीत सांगितले की, नित्यानंद यांचा भारताकडून छळ होत आहे. स्वत:ला विजयप्रिया नित्यानंद म्हणवणारी एक महिला गेल्या आठवड्यात कैलासाची कायमस्वरूपी राजदूत म्हणून जीनिव्हा येथे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या (सीईएससीआर) बैठकीत सहभागी झाली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...