आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीरियात केलेल्या एका ड्रोन हल्ल्यादरम्यान इसिसच्या एका कमांडरला मारल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकन सैन्यानुसार, या कमांडरचे नाव खालिद अय्यद अहमद अल-जबौरी होते. युरोपातील दहशतवादी हल्ल्यांच्या कटात त्याचा हात होता. त्याच्या मृत्यूनंतर इसिससाठी आता युरोपात हल्ल्याचा कट आखणे कठीण होईल.
तर सीरियन सिव्हिल डिफेन्स फोर्स व्हाइट हेल्मेटसने म्हटले आहे की हल्ल्यानंतर आम्ही एका व्यक्तीला जखमी अवस्थेत रेस्क्यू केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. ब्रिटनमधील सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइटसने म्हटले - सोमवारी ड्रोन हल्ल्यात केफतीन गावाजवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
फेब्रुवारीत इब्राहिम अल हाश्मी मारला गेला होता
यापूर्वी फेब्रुवारीतही अमेरिकेने सीरियात एक ड्रोन हल्ला केला होता. यात त्यांनी इस्लामिक स्टेटचा कमांडर इब्राहिम अल हाश्मी अल कुरैशीला मारले होते. माहितीनुसार, उत्तर सीरियातील हे ऑपरेशन अमेरिकेच्या 24 कमांडोंनी पूर्ण केले होते. यादरम्यान रीपर ड्रोन्सचाही वापर करण्यात आला होता. असेच एक ऑपरेशन 2019 मध्ये झाले होते. यात इसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी मारला गेला होता.
इदलिबमध्ये अमेरिकेचा हवाई हल्ला
डिसेंबरच्या सुरूवातीला अमेरिकेच्या एमक्यू-9 रीपर ड्रोनने इदलिब प्रांतात अल-कायदाच्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीच्या संशयातून हवाई हल्ला केला होता. मात्र हलल्याच्या प्राथमिक विश्लेषणातून कळाले की ड्रोन मिसाईलने अल-कायदा लीडरसह एका सीरियन कुटुंबावरही हल्ला केला. यात दहशतवाद्याचा मृत्यू झाला तर सीरियन कुटुंब जखमी झाले होते.
अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले लोक अल-कायदाचे सदस्य
अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून वायव्य सीरियात अल-कायदाशी संबंधित दहशतवादी आणि इसिसच्या सदस्यांना लक्ष्य करत आहे. यादरम्यान बंडखोरांच्या ताब्यातील इदलिब प्रांतात मारले गेलेले बहुतांश लोक अल-कायदाची शाखा होरास अल-दीनचे सदस्य होते. अरबी भाषेत याचा अर्थ धर्माचे रक्षक असा होतो. या समूहात कट्टर अल-कायदा सदस्यांचा समावेश आहे.
इराक-सीरियात सुमारे 7 हजार इसिस दहशतवादी उपस्थित
इसिसने पश्चिम सीरियापासून पूर्व इराकपर्यंतच्या 88 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला होता. यानंतर 2019 मध्ये इस्लामिक संघटनेला बाहेर हाकलण्यात आले होते. तथापि गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राने इशारा दिला होता की सीरिया आणि त्याच्या आसपासच्या देशांत इसिसचा धोका वाढत आहे. बीबीसीनुसार इसिसचे 5000-7000 सदस्य इराक आणि सीरियात पसरलेले आहेत. यापैकी अर्धे लोक संघटनेचे हल्लेखोर आहेत.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.