आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:अमेरिका : 50 पैकी 19 राज्यांत संसर्गकमी, 30 मध्ये लाॅकडाऊन सवलत

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • नियमाचे उल्लंघन केले नसते तर १ काेटी लाेक झाले असते बाधित
  • 11 राज्यांंतर्गत सवलत, 4 मध्ये पुढील आठवड्यात, 5 राज्ये बंद

ज्यूली बाॅसमन/ अॅमी हार्मन/ मिच स्मिथ

अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी १९ प्रांतात काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. तीन राज्यांतील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. इतर राज्यांत हे प्रमाण स्थिर आहे. संसर्ग प्रमाण कमी झालेल्या राज्यांत न्यूयाॅर्क, मॅसाच्युसेट्स, हवाई व अलास्का यांचा प्रामुख्याने समावेश हाेताे.

न्यू आेरलीनसमध्ये एप्रिल महिन्यात दरराेज शेकडाे रुग्ण येत हाेते. तेथे आता संसर्गामुळे आता दरराेज ५० पेक्षाही कमी बाधित रुग्ण आढळून येतात. तेथे साेमवारपासून मीट प्रकल्प पुन्हा सुरू हाेणार आहे. तेथे काम करणारे शेकडाे कर्मचारी कामावर परततील. परिस्थितीत सुधारणा हाेत असल्याचे दाेन तृतीयांश राज्यांना वाटते. देशातील ३० राज्यांत लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. ११ राज्यांनी काही भागांत लाॅकडाऊनमध्ये सवलत दिली. ४ राज्ये पुढील आठवड्यात लाॅकडाऊनमध्ये सवलत देतील. पाच राज्यांत मात्र अजूनही कडक लाॅकडाऊन लागू राहणार आहे. अमेरिकेत लाॅकडाऊनमधील सवलती अंतर्गत किनारपट्या, जिम, रिटेल दुकाने, रेस्तराँ, बार, सलून, थिएटर, उद्याेग, कार्यालये, धार्मिक स्थळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. अमेरिकेने मार्चपासून लाॅकडाऊनचे कडक पालन करण्यास सुरुवात केली हाेती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा व अनेक आस्थापने बंद करण्यात आली हाेती. एप्रिलमध्ये अनेक राज्यांनी े सवलत देण्यास सुरुवात केली. तेव्हा ४३.८ टक्के लाेकांनी स्टे अॅट हाेमचे चांगल्या प्रकारे पालन केले. येल विद्यापीठाच्या अहवालानुसार अमेरिकेत अधून-मधून अचानक काेराेना बाधितांची संख्या वाढली हाेती. त्यामागे नर्सिंग हाेम्स, कार्यालये, अन्न प्रक्रिया उद्याेगात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नव्हते. अमेरिकेतील ७० टक्के लाेकसंख्या काैंटीमध्ये राहते. येथील लाेक सामान्यपणे घराबाहेर पडत नाहीत. अमेरिकेत स्टे अॅट हाेमचे पालन झाले नसते तर एप्रिल अखेरीस आणखी १ काेटी लाेक बाधित झाले असते. अमेरिकेत १५ लाख ७ हजार ७९८ रुग्ण आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...