आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक हाहाःकार माजवला आहे. येथे एक महिन्यापासून दिवसाला 20 हजारांपेक्षा अधिक प्रकरणे समोर येत आहेत. तसेच दररोज एक हजार लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती सामान्य होण्याचे नाव घेत नाहीये. कोरोना रोखण्यासाठी सरकार मार्ग शोधत आहे. लोक जीवन जगण्याचे मार्ग शोधत आहेत. सरकार शटडाउन आणि सोशल डिस्टन्सची अधिसूचना जारी करून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे. निर्बंधात सवलत मिळावी या मागणीसाठी लोक रस्त्यावर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये हजारो लोकांनी मास्क न घालता राज्य कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शन केले.
उष्णतेमुळे लोक घराबाहेर पडत आहेत
उष्णात आणि वाढत्या तापमानामुळे शनिवारी लाखो अमेरिकन लोक घरातून बाहेर पडले होते. न्यूयॉर्क सिटीत तापमान 21 डिग्रीच्या आसपास होते. अशा परिस्थितीत मेयर बिल डे ब्लासियो यांना लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करावे लागले. तर न्यूजर्सीमध्ये शनिवारी काही गोल्फ कोर्स उघडण्यात आले आहेत. आजकाल अशा सर्व गोष्टी अमेरिकेत घडत आहेत.
कोरोनामुळे अमेरिकन लोकांच्या आयुष्यात किती बदल झाला आहे, लोक कसे जगतात, ते या न पाहिलेल्या फोटोंद्वारे जाणून घ्या...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.