आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षता आवश्यक:लॉकडाऊन दोन आठवडे आधी हवा होता; अमेरिकेत वाचले असते 54 हजार प्राण

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र व्हाइस हाऊससमोरील आहे. येथे लोकांनी बॉडी बॅग ठेवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विरोध केला. ते म्हणाले, ट्रम्प खोटे बोलतात. परंतु लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात अयशस्वी ठरले आहे. - Divya Marathi
छायाचित्र व्हाइस हाऊससमोरील आहे. येथे लोकांनी बॉडी बॅग ठेवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विरोध केला. ते म्हणाले, ट्रम्प खोटे बोलतात. परंतु लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात अयशस्वी ठरले आहे.
  • कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनामुळे मृत्यूसंबंधी जारी अहवालातील दावा

अमेरिकेत दोन आठवडे आधी लॉकडाऊन लागू केला असता तर कोरोना विषाणू संसर्गामुळे ८३ टक्के प्राण वाचवता येऊ शकले असते. कोलंबिया विद्यापीठातील एका अभ्यासाद्वारे हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी ३ मेपर्यंत आकड्यांचा अभ्यास केला. त्यानुसार सरकारने १ मार्चपूर्वी लॉकडाऊन लागू केला असता तर ११ हजार २५३ जणांचा मृत्यू झाला असता. सध्या मात्र मृतांची संख्या ६५ हजार ३०७ एवढी आहे. त्याचाच अर्थ दोन आठवडे आधी लॉकडाऊन लागू करायला हवा होता. त्यामुळे ५४ हजार ५४ जणांचे प्राण वाचवता येऊ शकले असते. संशोधन विभागाचे प्रमुख जेफरी शमन म्हणाले, मृतांच्या संख्येत ही मोठी तफावत म्हणावी लागेल. संसर्गातील प्रत्येक क्षण जाणून घेतला पाहिजे. अमेरिकेत कोरोनाचे आतापर्यंत १५ लाख ९३ हजार २९७ रुग्ण आढळून आले आहेत, तर ९४ हजार ९४८ जणांचा मृत्यू झाला.

राज्यांचा निर्णय : बाधित न्यूयॉर्कचा लॉकडाऊनला सर्वाधिक विलंब

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १६ मार्च राेजी अमेरिकी लोकांना मर्यादित प्रवास करण्याचे आवाहन केले होते. जास्त लोकांनी एकत्र येता कामा नये. घरातच राहावे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला होता. त्यामुळेच राज्यांनी वेगवेगळ्या वेळी लॉकडाऊन लागू केले होते. सर्वाधिक बाधित न्यूयॉर्कमध्ये २२ मार्च रोजी स्टे अॅट होमचा आदेश जारी केला होती. न्यूयॉर्क सिटीमध्ये एक आठवडे आधी लॉकडाऊन लागू झाला असता तरी ३ मेपर्यंत येथे २ हजार ८३८ जणांचा मृत्यू झाला होता.

बॉडी बॅग ठेवून ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने

व्हाइस हाऊससमोर लोकांनी बॉडी बॅग ठेवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विरोध केला. ते म्हणाले, ट्रम्प खोटे बोलतात. परंतु लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात अयशस्वी ठरले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनी पुन्हा अमेरिकेत शिक्षणासाठी यावे : मंत्री

अमेरिकेच्या दक्षिण आशियाई संबंधाचे उपमंत्री एलिस वेल्स म्हणाले, कोरोनाने चिंता व अनिश्चिततेची स्थिती निर्माण केली आहे. परंतु परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी यावे. वेल्स अटलांटिक कौन्सिलची ऑनलाइन चर्चा होत होती. परदेशांत विद्यार्थ्यांचे शिक्षण हा मुद्दा होऊ पाहतोय. शैक्षणिक संस्थाही बंद आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेत भारताचे २ लाखांहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत होते. आम्ही खुल्या मनाने भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत स्वागत करत आहोत.

आशियाई डॉक्टरांकडून उपचारास केली मनाई, चिनींवर जास्त संताप

अमेरिकेत आशियातील डॉक्टर व परिचारिकांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात अशा काही घटना उजेडात आल्या. त्यात कोरोना उपचारासाठी नकार देण्यात आला. बोस्टन रुग्णालयात एका रुग्णाने चिनी डॉक्टरला सुनावले- तुम्ही चिनी लोक सर्वांना का मारत आहात? आशियातील लोकांमुळे कोरोना होतो, असाही काही अमेरिकी लोकांचा समज आहे. अमेरिकेत १८ टक्के डॉक्टर व १० टक्के नर्स आशियाई वंशाच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...