आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट येत आहे. याचे मोठे संकेत ४ राज्ये अॅरिझोना, टेक्सास, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियात दिसत आहेत. जॉन हाफकिन्स सेंटर, पेरेलमॅन स्कूल ऑफ मेडिसीनसह कमीत कमी ५ संस्थांच्या संशोधकांनी आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे. टेक्सास, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया टॉप १० बाधित राज्यांत आहेत. जॉन हाफकिन्स सेंटरचे संशाेधक एरिक टोनर यांनी सांगितले की, कोरोनाची नवी लाट सध्या लहान आणि लांब दिसत आहे. मात्र, ती अमेरिकेच्या काही भागात येत आहे. संसर्गाची प्रकरणे अनलाॅक आणि वंशवादाविरोधातील आंदोलनामुळे झालेल्या गर्दीमुळे वाढल्याचे म्हणणे घाईचे ठरेल. असे यामुळे म्हणू शकतो कारण जॉर्जियात हेअर सलून, टॅटू पार्लर, जिम दीड महिन्यापूर्वी सुरू झाले होते. मात्र, तेथे रुग्ण घटले होते. पेरेलमॅन स्कूल ऑफ मेडिसीनचे जैवसांख्यिकी विभागाचे संचालक जेफरी मॉरिस यांचे म्हणणे आहे की, आता जास्त सावध राहण्याची गरज आहे. एफडीए आयुक्त स्टीफन हान यांनी सांगितले की, ते अनलाॅक आणि वाढत्या रुग्णांबाबत अभ्यास करत आहेत, कारण एका आठवड्यात अनेक रुग्ण अचानक वाढले तर काही ठिकाणी काहीच नाही. अमेरिकेत आतापर्यंत २०६६६११ रुग्ण आहेत, तर ११५१४० मृत्यू झाले आहेत.
ती ४ राज्ये जेथे दिसतो धोका, यातील तीन टॉप १० बाधित राज्यांमधील
कॅलिफोर्निया: लॉस एंजलिसमध्ये राज्याच्या ५०% नवी प्रकरणे, सॅन फ्रान्सिस्कोत कमी
कॅलिफोर्नियात मार्चच्या अखेरीस स्टे अॅट होम लागू झाले होते. गेल्या एका आठवड्यात येथील लॉस एंजलिसमध्ये राज्याच्या ५० टक्के म्हणजे ८५६२ नवी प्रकरणे आढळली आहेत.
फ्लोरिडा: अनलॉकनंतर एक आठवड्यात ८५५३ प्रकरणे, ७ दिवसांत सर्वाधिक
अनलॉकनंतर फ्लोरिडात एका आठवड्यात ८५५३ प्रकरणे आली आहेत. हा आतापर्यंतचा एका आठवड्यातील सर्वाधिक आकडा आहे. मात्र, आरोग्य विभागाने म्हटले आहे की, जास्त चाचण्यांमुळे रुग्ण वाढले आहेत.
अॅरिझोना: २ आठवड्यांत अचानक रुग्ण वाढले, २४ तासांत सर्वाधिक १५५६
अॅरिझोनामध्ये २ आठवड्यांत रुग्ण अचानक वाढले. येथे २४ तासांत सर्वाधिक १५५६ नवी प्रकरणे आली आहेत. आरोग्य विभागाने रुग्णालयांना आपत्कालीन योजना तयार करायला सांगितले आहे.
टेक्सास: एका दिवसात सर्वाधिक २५०४ नवे रुग्ण, अनलॉकला विरोध
टेक्सासमध्ये २५०४ नवे रुग्ण आढळले आहेत. हा एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. राज्यात एका दिवसात रुग्णालयात ४.७ टक्के रुग्ण वाढले आहेत. गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी लोकांना सावध राहायचे म्हटले आहे.
कोरोनाच्या लवकर चाचणीमुळे येऊ शकताे चुकीचा निकाल : संशोधन
वॉशिंग्टन| एखाद्या रुग्णाची कोरोनाची खूप लवकर चाचणीचे निकाल चुकीचे येऊ शकतात. जॉन हाफकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी एका संशोधनात हा दावा केला आहे. त्यानुसार विषाणूची तपासणी लक्षणे दिसल्याच्या ३ दिवसांनी करणे चांगले असते. संशोधकांनी रुग्णालयात दाखल रुग्णांसह अनेक रुग्णांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.