आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • America : Curfew In 40 US Cities, Including Washington; Trump Was Taken To The Underground Bunker During A Demonstration At The White House

कृष्णवर्णीय मृत्यू प्रकरण:वॉशिंग्टनसह 40 शहरांत कर्फ्यू; व्हाइट हाऊस समोर झालेल्या निदर्शनादरम्यान ट्रम्प यांना बंकरमध्ये हलवले

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वॉशिंग्टनमध्ये 6 दिवसांपासून निदर्शने सुरू, रविवारी रात्री व्हाइट हाउससमोर निदर्शकांवर अश्रूधुराचा मारा

अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड मृत्यू प्रकरणात विरोध वाढत चालला आहे. राजधानी वॉशिंग्टन डीसीसह 40 शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. रविवारी रात्री आंदोलकांनी व्हाइट हाउससमोर निदर्शन केले. यामुळे सुरक्षादलांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, शुक्रवारी व्हाइट हाउससमोर निदर्शनादरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना काही वेळासाठी अंडरग्राउंड बंकरमध्ये हलवण्यात आले होते.  

सीएनएन न्यूज चॅनलनुसार, वॉशिंग्टनसह 15 शहरांमध्ये सुमारे 5 हजार नॅशनल गार्ड्स तैनात केले आहेत. गरज भासल्यास 2 हजार रक्षकांना तातडीने तयार राहण्यास सांगितले आहे. 

व्हाइट हाउसवर शेकडो निदर्शक जमल्याने घेतला निर्णय 

न्यूयॉर्क टाइम्सने एका व्यक्तिच्या हवाल्याने बातमी छापली. यानुसार, शुक्रवारी व्हाइट हाउसवर शेकडोंच्या संख्येने आंदोलक जमले. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रम्प यांना एका तासापेक्षा कमी वेळेसाठी एका अंडरग्राउंड बंकरमध्ये नेले होते. निदर्शकांना मागे हटवण्यासाठी सीक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट्स पार्क पोलिसांना कठोर मेहनत घ्यावी लागली. 

वृत्तपत्रानुसार, व्हाइट हाउसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शक जमा झाल्याने ट्रम्प यांची टीम आश्चर्यचकीत झाली होती. मेलेनिया आणि बॅरन ट्रम्प यांना बंकरमध्ये नेण्यात आले की नाही हे स्पष्ट झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...