आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • America : Death Toll Rises To 2.5 Lakh, 49 Out Of 50 States Have New Cases, Death Toll Rises 55% In 14 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:मृतांची संख्या 2.5 लाखांवर, 50 पैकी 49 राज्यांत नवे रुग्ण जास्त, 14 दिवसांत मृतांच्या संख्येत 55 % वाढ, बाधितांचे प्रमाणही वाढले

न्यूयॉर्क टाइम्स9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांची संख्या 2.5 लाखांवर, 50 पैकी 49 राज्यांत नवे रुग्ण जास्त

अमेरिकेत कोरोना महामारीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या २.५० लाखांहून जास्त झाली आहे. गेल्या १४ दिवसांत मृत्युसंख्या ५२ टक्क्यांनी वाढली आहे. नवीन बाधितांचे प्रमाणही ७७ टक्क्यांनी वाढले आहे. अमेरिकेतील ५० पैकी ४९ राज्यांत नवे रुग्ण वाढले आहेत. केवळ हवाईमध्ये गेल्या १४ दिवसांत पॉझिटिव्ह केसच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत मृत्युसंख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण सामान्यपणे कोरोना संसर्ग वाढल्याच्या काही दिवसांनंतर मृत्युसंख्येतही वाढ होते. लवकरच फाइजर व मॉडर्नाद्वारे विकसित लस उपलब्ध होईल, अशी अमेरिकेला आशा आहे. लस येईपर्यंत दक्षता बाळगली गेली नाहीतर मोठी हानी होऊ शकते. अमेरिकेतील राज्ये आपापल्या स्तरावर संसर्गाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आेहिआेमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मिसिसीपी व आयआेवामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मेरीलँडमध्ये बार, रेस्तराँ, नाइट क्लबला रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिनिसोटाचे गव्हर्नर टीम वॉल्टज नियमांचे कडक पालन करण्याच्या बाजूने आहेत. ते म्हणाले, आमच्या पायाखालची जमीन घसरू लागली आहे. आपण कठोर पावले उचलली पाहिजेत. दुसरीकडे न्यूयॉर्क प्रशासनाने पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ आठवड्यांपूर्वीच शाळा सुरू झाल्या होत्या.

पेन्सिल्वेनियामध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला राज्यात प्रवेश करायचा झाल्यास निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. कॅलिफोर्नियातही आणीबाणीची स्थिती आहे. लॉस एंजलिसमध्ये उद्योगांसाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला.

हे युद्ध आहे, देशाला कमांडर-इन-चीफची गरज : बायडेन

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोनाशी लढण्यासाठी स्वत:ला सरकारी सोयी-सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. हे युद्ध आहे. देशाला कमांडर-इन-चीफची गरज आहे.

दुसरीकडे अमेरिकी सरकारमधील संसर्गजन्य रोगतज्ञ अँथनी ए. फाउची म्हणाले, सद्य:स्थितीत संपूर्ण देशाने एका कृती आराखड्यावर काम केले पाहिजे. प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने नियम तयार करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ही पद्धत प्रभावी नाही. सत्ता हस्तांतरणावरून अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे देशात अस्थिरता वाढू लागली आहे.

दैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत
जर्मनीत हजारोच्या संख्येत लोक बुधवारी राजधानी बर्लिनमध्ये रस्त्यावर उतरले होते. या निदर्शकांनी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. निदर्शकांना हटवण्यासाठी मोठ्या संख्येने दंगल प्रतिबंधक पोलिसांना तैनात करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले. काही आंदोलक संसद भवन बुंदसटॅगमध्ये घुसले होते. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.