आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:माझ्यावरील उपचार संपूर्ण अमेरिकेला मोफत देऊ : डोनाल्ड ट्रम्प

मिशिगन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणुकीच्या तोंडावर 22 लाख जाहिराती हटवल्या

माझ्यावर झालेला उपचार अमेरिकेतील सर्वांना मोफत उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी सुपर रिकव्हरी व बायडेन डिप्रेशन या दोन पर्यायातून निवड करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मिशिगन येथील प्रचार सभेत ते बाेलत होते.

ट्रम्प पुढे म्हणाले, डेमोक्रॅटिकचा विजय झाल्यास मिशिगनमधील कोरोनाची स्थिती आणखी वाईट करणारी ठरू शकते. सोबतच संपूर्ण अमेरिकेचीदेखील हानी करू शकते. ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर चीनसाठी काम करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, चीनच्या विरोधात अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षांनी एवढी कडक भूमिका घेतली नव्हती. मी ४७ महिन्यांत केलेले काम बायडेन यांना करण्यासाठी ४७ वर्षे लागली. बायडेन यांना सत्ता मिळाल्यास ते आपल्या सामाजिक सुरक्षेला नष्ट करतील. ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना आरोग्यासाठी शुभेच्छा दिला. त्यांची प्रकृती चांगली असावी असे मला वाटते. संसर्ग झाल्यामुळे हॅरिस यांनी आपली प्रचार सभा रद्द केली. त्याच्या काही वेळ आधी बायडेन यांच्या चार्टर विमानातील एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचा दुजोरा देण्यात आला होता. बायडेन यांच्या प्रचार दौऱ्यातदेखील एक कर्मचारीही बाधित झाला होता.

निवडणुकीच्या तोंडावर 22 लाख जाहिराती हटवल्या
एका सोशल मीडियाने निवडणुकीच्या तोंडावर २२ लाख संशयित जाहिराती हटवल्या आहेत. त्याचबरोबर वादग्रस्त १.२ लाख पोस्टदेखील हटवल्या आहेत. या जाहिरातींच्या द्वारे ३ नोव्हेंबरच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अडथळा आणण्याचे प्रयत्न केले जात होते, असे सोशल मीडिया कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचे अधिकारी निक क्लेग यांनी ही माहिती दिली. आम्ही या निवडणुकीसाठी अनेक पातळ्यांवर अभूतपूर्व तयारी केली आहे. २०१६ च्या तुलनेत आम्ही अधिक चांगल्या प्रकारे सज्ज आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...