आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • America Election Latest News; Trump Encourages People In North Carolina To Vote Twice, Which Is Illegal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत निवडणुका:ट्रम्प यांचा बेकायदेशीर सल्ला; म्हणाले - नॉर्थ कॅरोलिनाच्या लोकांनी दोन वेळा वोटिंग करावी, एकदा बॅलेटने आणि दुसऱ्यांदा पोलिंग स्टेशनमध्ये जाऊन, यामुळे सिस्टमची तपासणी होईल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प म्हणाले की, ही यंत्रणा बळकट असेल तर लोकांना पुन्हा मतदान करता येणार नाही
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सातत्याने मेल इन बॅलेट मतदानावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने मेल वोटिंगला विरोध करत आहेत. बुधवारी त्यांनी एक विचित्र सल्ला दिला. उत्तर कॅरोलिनाच्या लोकांनी दोनदा मतदान करावे आणि निवडणूक यंत्रणेची सुरक्षा तपासावी. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली सूचना बेकायदेशीर आहे. परंतु, ट्रम्प यांचे म्हणणे आहे की यामुळे मतदानाच्या यंत्रणेची योग्य तपासणी होऊ शकेल.

याने सिस्टमची चाचणी होईल

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लोकांना बॅलेट वोटिंग आणि निवडणुकीच्या दिवशी स्वतः जाऊन वोट करण्यासही सांगितले. ते म्हणाले, त्यांना बॅलेट पाठवू द्या आणि सोबतच मतदानासाठी जाऊ द्या. असा दावा केला जातो की आपली यंत्रणा बळकट आहे. जर हे सत्य असेल तर लोकांना पुन्हा मतदान करता येणार नाही. आणि या प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास लोक दोनदा मतदान करतील.

ट्रम्प यांची सूचना बेकायदेशीर आहे

एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करणे बेकायदेशीर आहे. परंतु ट्रम्प यांची सूचना सहकार्यांशी चर्चा केल्यानंतर आली आहे. अमेरिकेतील कोरोनामुळे बॅलेट वोटिंगची संख्या वाढत आहे. ट्रम्प याचा विरोध करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मेल-इन बॅलेट मतदानात मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते.

योग्य सल्ला, पण गोंधळ जास्त

ट्रम्पच्या सल्लागारांनी त्यांना सांगितले की, सर्व प्रकारच्या मेल इन बॅलेटचा विरोध करु नका. कारण, यामुळे ते वृद्ध आणि आजारी समर्थकांची मते गमावू शकता. या सल्लागारांनी ट्रम्प यांना यूनिव्हर्सल मेल वोटिंग आणि एब्सेंटी वोटिंगमधील फरक करण्यास सांगितले आहे.

एब्सेंटी वोटिंग त्या लोकांसाठी असते जे विकलांग आहेत किंवा आपल्या घरापासून दूर आहेत. त्यांना वोटिंगपूर्वी एक फॉर्म भरायचा असतो. यामध्ये हे सांगायचे असते की, ते कोणत्या कारणामुळे पोलिंग स्टेशनवर येऊ शकत नाही. यानंतर निवडणूक आयोग त्यांना बॅलेट पेपर पाठवते. या माध्यमातून ते वोटिंग करतात. यूनिव्हर्सल मेल वोटिंगचा अर्थ असा आहे की, प्रत्येकजण घरातूनही वोट देऊ शकते. यासाठी कोणतेही कारण विचारले जात नाही.

दुहेरी वोटिंग शक्य नाही
अटार्नी जनरल विलियम बार यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला. दरम्यान राज्यांजवळ दुहेरी वोटिंगपासून बचाव करण्याच्या अनेक पद्धती आहेत. नॉर्थ कॅरोलिना स्टेट बोर्ड ऑफ इलेक्शनच्या वेबसाइमध्ये अनेक प्रकारच्या सुरक्षा उपायावषयी माहिती देण्यात आली आहे. गेल्यावर्षी एका मुलाखतीत वॉशिंगटनचे सचिव किम वियान म्हणाले होते की, कोणताही वोटर पुन्हा मतदान करु शकत नाही. वॉशिंगटनमध्ये 2018 मध्ये मेल वोटिंगने निवडणुका झाल्या होत्या. वियान म्हणाले , 'आपण त्या लोकांची लिस्ट काढू शकतो. ज्यांनी एकपेक्षा जास्त वेळा वोटिंग केली असेल. 2018 मध्ये टाकण्यात आलेल्या 35 लाख बॅलेटमधून जवळपास 100 लोकांनी एकपेक्षा जास्त वेळा वोटिंग केली होती.'