आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन महिन्यांपासून अमेरिका गोळीबाराच्या घटनांशी झगडतेय. गन हिंसाचार प्राधिकरणानुसार ३ एप्रिलपर्यंत ८०७६ जणांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे. नवीन आकडेवारी व ट्रेंडमधून सध्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक बंदूक विक्री होत असल्याचे दिसते ही चिंतेची बाब आहे. या नव्या ट्रेंडनुसार खरेदीदारांमध्ये हेट क्राइममुळे गोळीबाराला सहज बळी ठरणारे अर्धे आशियाई अमेरिकी असून त्यातही बहुतांश चिनी आहेत. न्यूयॉर्कमध्ये बंदूक व्यावसायिक जिम्मी गांग सांगतात की, नवीन खरेदीदारांमध्ये चिनी अमेरिकींच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. एवढ्या संख्येत बंदूक विक्री होताना मी कधीच पाहिले नव्हते. शस्त्र खरेदी करण्यात आतापर्यंत चिनी नागरिक मागे होते. मात्र, न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आशियाई समुदायावरील गोळीबाराच्या घटना नऊपट वाढल्याने लोक संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करत आहेत.
गांग सांगतात, महामारीच्या काळात बंदुकांची विक्री दुप्पट झाली आहे. यातील अर्धा व्यवसाय आशियाई अमेरिकींकडून होत आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मदत निधीतून मिळालेल्या पैशाचा वापर लोक बंदूक खरेदीसाठी करत आहेत. देशातील अनेक बंदूक दुकान मालकांचे म्हणणे आहे की, अमेरिकी नागरिकांचा एक वर्ग बंदूक घेण्यासाठी मदत निधीचा वापर करत आहे. आता त्यांना दुसऱ्या टप्प्यातील मदत निधीची प्रतीक्षा आहे. फ्लोरिडाचे ब्रँडन हेक्सलर सांगतात की, मदत निधी म्हणजे ‘गन मनी’. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लोकांना मदत निधीत १२०० डॉलर मिळाले होते. त्या वेळी विक्री २०% वाढली होती. दुसऱ्या टप्प्यातील धनादेश मिळताच विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
नॅशनल अाफ्रिकन अमेरिकन गन असोसिएशनचे संस्थापक फिलिप स्मिथ सांगतात की, गोळीबाराच्या घटनांनी लोकांना बंदुका घेण्यास उद्युक्त केले आहे. ते सांगतात, बंदूक घ्यावी लागेल अशी ज्यांनी कल्पनाही केली नसेल तेही बंदूक खरेदी करत आहेत. स्वत:ला व कुटुंबाला कसे वाचवता येईल याचा लोक गंभीरपणे विचार करत आहेत. यंदा जानेवारीत एफबीआयकडे ४३ लाख खरेदीदारांचे पडताळणीसाठी अर्ज आले होते, तर जानेवारी २०२० मध्ये २७ लाख होते. बहुतांशी प्रकरणात बंदूक विक्रेते आपल्या पातळीवर पार्श्वभूमीची पडताळणी करतात. अमेरिकेच्या संविधानाच्या दुसऱ्या दुरुस्तीमुळे येथील लोकांना शस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे. येथे दहापैकी ३ तरुणांकडे स्वत:ची बंदूक आहे. एनएसएसएफच्या नुसार यंदा बंदूक घेणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच बंदूक घेणारे, आया, एकल पालक, पालक यांचा वाटा वाढला आहे. विक्री वाढल्याने अमेरिकेच्या बाजारात बंदुकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
गन कल्चर महामारी, यामुळे जगभरात अमेरिकेची बदनामी : बायडेन
गन कंट्रोलबाबत गुरुवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ६ आदेश काढले. ते म्हणाले, गन कल्चर महामारी आहे, अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय बदनामी आहे. हे सार्वजनिक आरोग्याचे संकट आहे. कठोर होत बायडेन यांनी अमेरिकी न्याय विभागाला गन कल्चरवर नियंत्रणासाठी रेड फ्लॅग कायदा लागू करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे काेर्टात याचिका दाखल करून जी व्यक्ती स्वत: किंवा दुसऱ्यांसाठी धोकादायक असेल त्याला बंदूक घेण्यापासून रोखता येईल. घरीच तयार केल्या जाणाऱ्या बंदुकांना घोस्ट गन म्हटले जाते. त्यांच्यावर कोणताच अनुक्रमांक नसतो. यामुळे अशा बंदुका असलेल्यांची पार्श्वभूमी तपासता येत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.