आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात राहणारे सुमारे ४ कोटी लोकसंख्येला नाताळच्या दिवशी बंद घरात राहावे लागू शकते. कारण येथील लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग त्यामागील कारण आहे. आकडेवारीनुसार अमेरिकेत ३ डिसेंबरला सर्वाधिक २ लाख १८ हजार ५७६ रुग्ण आढळून आले. येथे एका दिवसात सर्वाधिक २ हजार ९१८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्येत कॅलिफॉर्निया आघाडीच्या ५ राज्यांत समाविष्ट झाला आहे. कॅलिफोर्नियात गुरूवारी एका दिवसात २१ हजार ८२५ बाधित आढळून आले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. कॅलिफोर्नियात एकाच दिवसात १४५ जण मृत्युमुखी पडले. या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर गॅविन न्यूसोम म्हणाले, आम्ही कारवाई केली नाही तर रुग्णालयातील व्यवस्था कोलमडून पडेल. मृत्यू वाढू शकतील.
सणासुदीच्या काळात संसर्गवाढीची चिंता
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत अमेरिकेचा समावेश होतो. आतापर्यंत देशात १ कोटी ४५ लाख ३५ हजार १९६ लोकांना बाधा झाली आहे. २ लाख ८२ हजार ८२९ जणांनी प्राण गमावले आहेत. या बाबत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. येथे ९५ लाख ७१ हजार ७८० जणांना बाधा झाली. भारतात बाधितांची संख्या सणासुदीमुळे वाढू शकते. ही अमेरिकेतील केंद्र तसेच राज्य सरकारची चिंता आहे. कारण पश्चिमेकडील देशांत नाताळ व न्यू ईयर तोंडावर आहेत. त्यामुळेच लॉस एंजिलिसने तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागू केले आहे. अमेरिकेत सुरूवातीपासूनच बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने कमालीची दुर्लक्ष केले होते. त्याचाही फटका बसला.
बस १०० दिवस मास्क, नियंत्रण मिळवू : बायडेन
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी देशातील लोकांना केवळ १०० दिवस मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, बस १०० दिवसांचा प्रश्न आहे. नेहमीसाठी नाही. १०० दिवस मास्क घातल्यास महामारीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या पहिल्याच दिवशी हे आवाहन करेल.
बाहेर जाऊन खाणे-पिणे, फिरणे, खेळणे इत्यादीवर बंधने
ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बाहेर जाऊन खाणे-पिणे, फिरणे, खेळणे इत्यादीवर बंधने येऊ शकतात. गव्हर्नर न्यूसोम म्हणाले, विनाकारण बाहेर भटकू नका, असा आमचा लोकांना सल्ला आहे. सलून, ब्यूटी पार्लरही बंद ठेवले जाऊ शकतात, असे तेथील प्रसार माध्यमातून सांगण्यात येते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.