आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत वर्षभरात हेट क्राईम 12% वाढले:2021 मध्ये कृष्णवर्णीयांविरोधात गुन्ह्याच्या 2,233 प्रकरणांची नोंद, 64.5% केस जात व रंगभेदाच्या

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत कृष्णवर्णीयांविरोधात हिंसेच्या घटना समोर आल्यावर अनेकदा आंदोलन झाले आहे.

अमेरिकेत द्वेषमूलक गुन्ह्यांच्या घटन 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात सर्वात जास्त घटना कृष्णवर्णीयांविरोधातील गुन्ह्यांच्या आहेत. सोमवारी एफबीआयने द्वेषमूलक गुन्ह्यांचा 2021 मधील अहवाल जारी केला. यानुसार 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये द्वेषमूलक गुन्ह्याच्या 945 घटना वाढल्या आहेत. अहवालानुसार 2021 मध्ये समोर आलेल्या 64.5 टक्के द्वेषमूलक गुन्ह्याच्या घटना रंग, जातीय किंवा वांशिक भेदभावावर आधारित होत्या. तर 15.9 टक्के घटना लिंगाधारित आणि 14.1 टक्के घटना धर्माधारित होत्या.

2021 मध्ये द्वेषमूलक गुन्ह्याच्या 9065 घटना समोर आल्या होत्या. यापैकी 55 टक्के घटना हल्ल्याच्या होत्या. यापैकी 18 प्रकरणे हत्या आणि 19 बलात्काराची प्रकरणे होती. याशिवाय 43 टक्के प्रकरणे धमकावण्याची तर 7 टक्के प्रकरणे तोडफोड आणि संपत्तीच्या नुकसानीची होती.

2021 मध्ये द्वेषमूलक गुन्ह्याची 9065 प्रकरणे समोर आली होती.
2021 मध्ये द्वेषमूलक गुन्ह्याची 9065 प्रकरणे समोर आली होती.

415 प्रकरणांत LGBTQ समुदायाविरोधात हिंसा

अहवालानुसार, द्वेषमूलक गुन्ह्याची सर्वाधिक 2233 प्रकरणे आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या लोकांविरोधात होती. तर धर्माधारित भेदभावाच्या प्रकरणांत सर्वाधिक ज्यूंना टार्गेट करण्यात आले होते. याशिवाय सुमारे 948 प्रकरणे गौरवर्णीयांचा द्वेष करणाऱ्यांविरोधात हिंसेची होती. 2021 मध्ये सुमारे 543 गे लोकांचा टार्गेट करण्यात आले होते. तर 415 प्रकरणांत LGBTQ समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्यात आले होते.

एफबीआयचे अधिकारी म्हणाले की अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसेला कोणतीही जागा नाही.
एफबीआयचे अधिकारी म्हणाले की अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसेला कोणतीही जागा नाही.

305 प्रकरणांत आशियाई समुदाय टार्गेट

2021 मध्ये द्वेषमूलक गुन्ह्याच्या प्रकरणांतील 433 केस स्पॅनिश कल्चर मानणाऱ्या लोकांविरोधात होत्या. तर सुमारे 305 प्रकरणांत आशियाई समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्यात आले होते. एफबीआयचे असोसिएट अॅटर्नी जनरल वनिता गुप्तांनी म्हटले - हेट क्राईम आणि यामुळे वाढत्या हिंसेला कोणतीही जागा नाही. अमेरिकेचा न्याय विभाग भेदभावावर आधारित वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहे.

डिसेंबरमध्ये एफबीआय अहवालात द्वेषमूलक गुन्हे कमी झाल्याचे म्हटले होते.
डिसेंबरमध्ये एफबीआय अहवालात द्वेषमूलक गुन्हे कमी झाल्याचे म्हटले होते.

डिसेंबर 2022 चा अहवाल काय होता

यापूर्वी डिसेंबर 2022 मध्येही एफबीआयने एक अहवाल जारी केला होता. यानुसार द्वेषमूलक गुन्ह्याच्या घटना कमी झाल्या होत्या. अहवालात म्हटले होते की 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये द्वेषमूलक गुन्ह्यांच्या 1000 कमी घटना समोर आल्या आहेत. तथापि तेव्हा एफबीआयने म्हटले होते की हे अहवाल अजून पूर्णपणे योग्य मानले जाऊ शकत नाही. असे यासाठी कारण तेव्हा यात न्यूयॉर्क सिटी आणि कॅलिफोर्नियातील बहुतांश शहरांतील पोलिस विभागाचा डेटा समाविष्ट करण्यात आला नव्हता.

अमेरिकेत वर्णद्वेषाचा इतिहास 250-300 वर्षे जूना

  • जेव्हा युरोपातील गौरवर्णीय स्थलांतरितांनी अमेरिकेत स्थायिक व्हायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आफ्रिकेतून लाखो गुलामही तिथे आणले होते. ते मजूर नव्हते, गुलाम होते. या कृष्णवर्णीय गुलामांसाठी घर, अन्न, कपडे, शिक्षण, औषधे आणि सुरक्षा, काहीही ठीक नव्हते. त्यांची जनावरांप्रमाणे खरेदी-विक्री केली जायची.
  • 1790 मध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येत कृष्णवर्णीयांचे प्रमाण 19.3 टक्के होते. मात्र त्यांना एक टक्काही नागरी अधिकार नव्हते. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. न्यायालयात न्यायाचा अधिकार नव्हता आणि उपचारांचाही अधिकार नव्हता.
  • जर एखादा गौरवर्णीय त्यांच्या एखाद्या गोष्टीवर नाराज झाला तर कृष्णवर्णीयांना जिवंत जाळले जायचे. झाडाला लटकावून फाशी दिली जायची. विहिरीत ढकलले जायचे. असे असूनही अमेरिकेचा दावा राहिला आहे की तो जगातील सर्वाधिक समतामूलक, स्वातंत्र्यमूलक आणि न्यायमूलक देश आहे.
बातम्या आणखी आहेत...