आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • America Is Suffering From Drought Waste Of Water From Hollywood Star, Unwilling To Accept Penalty, Connection Will Be Cut

अमेरिकेला दुष्काळाच्या झळा:हॉलीवूड स्टारकडून पाण्याचा अपव्यय, दंड होऊन मानण्यास तयार नाहीत, जोडणी कट होणार

न्यूयॉर्क / मोहम्मद अलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका व युरोपला दुष्काळाचा फटका बसला आहे. अमेरिकेत १२८ वर्षांच्या काळातील सर्वात भीषण दुष्काळ जाणवू लागला आहे. असे असले तरी हॉलीवूडची स्टार मंडळी मात्र पाण्याचा सर्रास वापर करू लागली आहे. किम कार्दिशियन, ड्वेन वेड, सिल्व्हेस्टर स्टेलॉन, केव्हिन हार्ट यासारखे अभिनेते पाण्याचा अपव्यय करत आहेत. कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिसच्या पालिकेने या स्टारला नोटीस बजावतानाच दंडही आकारला. किमने नियोजित मर्यादेच्या पलीकडे म्हणजे सुमारे १०.४५ लाख लिटर पाण्याचा वापर केला. कर्टनी कार्दिशियनच्या बंगल्यात गरजेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ४ लाख ५४ हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. किम व कर्टनीला वारंवार नोटीस पाठवण्यात आली. त्यांनी हजार डॉलरचा दंड दिला. परंतु पाण्याचा अपव्यय थांबवला नाही. आता पालिका त्यांचे कनेक्शन कापण्याचा विचार करत आहे. दुष्काळाच्या समस्येमुळे त्रस्त प्रशासनाने निश्चित सीमेपर्यंत पाण्याचा उपयोग करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांचे घराची लांबी, रुंदी लक्षात घेऊन पाण्याचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. परंतु किम कार्दिशियन, ड्वेन वेड, सिल्व्हेस्टर स्टेलॉन, केव्हिन हार्ट यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक तारकांनी निश्चित मर्यादेपेक्षा १००० ते १५०० टक्के जास्त पाण्याचा वापर केला. पालिकेच्या जल विभागाचे प्रवक्ते माइक मॅकनेट यांच्या म्हणण्यानुसार लोकप्रिय कलाकारांनी पाण्याचा अपव्यय टाळला तर पाण्याच्या समस्येवर तोडगा काढता येऊ शकेल. परंतु त्यांना आपली जबाबदारी लक्षात येत नाही. सध्या टीव्ही स्टार कार्दिशियन व अभिनेता स्टेलॉन यांना इशारा देण्यात आला आहे. या कलाकारांच्या घरात पाणी नियंत्रक उपकरणही लावण्यात आले आहेत. आता त्यानंतरही पाण्याचा अतिवापर थांबला नाही तर त्यांचे कनेक्शन बंद केले जाईल.

२३ वर्षांपासून दुष्काळाला ताेंड देणारे लॉस एंजलिस शहर लॉस एंजलिस गेल्या २३ वर्षांपासून दुष्काळाला तोंड देणारे शहर आहे. यंदा जूनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले. पाण्याचा निम्मा वापर हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. उद्यानात आठवड्यातून केवळ एक वेळा पाणी देता येणार आहे. पाण्याचा किमान वापर करावा. पाण्याची बचत करा. संरक्षण करा, असे आवाहन पालिकेच्या नोटिसीतून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...