आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • America People Wants To Be Independent Trump; The President Issued The Plan, Guidelines For The States

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:अमेरिकेतील जनता स्वतंत्र राहू इच्छिते - ट्रम्प; राष्ट्राध्यक्षांनी मांडली योजना, राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी मिशिगनमध्ये हजारो लोकांनी लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने केली होती

जगातील महाशक्ती अमेरिका दुहेरी दबावाखाली आहे. एकीकडे सर्वाधिक कोरोनापीडित देश व देशांतर्गत लॉकडाऊन संपवण्यासाठी वाढलेला दबाव अशा स्थितीत अमेरिका आहे. गुरुवारी मिशिगनमध्ये हजारो लोकांनी लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने केली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला तीन टप्प्यांत सुरू करण्याची योजना मांडली. त्यासंबंधी राज्यपालांना निर्देशही दिले. या युद्धात आता ओपनिंग अप अमेरिका अगेन म्हणजेच अमेरिकेला पुन्हा सक्रिय करणे होय. अमेरिकेला स्वतंत्र राहायचे आहे. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी ही योजना म्हणजे अस्पष्ट व सुसंगत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

ट्रम्प यांचे तीन टप्पे असे- 

  • पहिला टप्पा : अनावश्यक प्रवास टाळावा, गटाने एकत्र येणे टाळावे. रेस्तराँ, पूजेची ठिकाणे, क्रीडा मैदानांवर डिस्टन्सिंग प्रोटोकॉलनुसार काम करता येऊ शकेल.
  • दुसरा टप्पा : कोरोना विषाणू परतण्याची चिन्हे किंवा पुरावा नसल्यास प्रवास करता येऊ शकेल. शाळाही सुरू करता येऊ शकतील. कमी लोक उभे राहू शकतील असे बारही खुले होऊ शकतात.
  • तिसरा टप्पा : कोरोनाचे रुग्ण कमी होत असलेल्या राज्यांत शारीरिक अंतर बाळगण्याच्या नियमाचे पालन करावे. लोकांना भेटीगाठीची परवानगी देता येईल. कमकुवत इम्युनिटी असलेल्या लोकांनी गर्दी टाळलेली बरी.
बातम्या आणखी आहेत...