आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत एका इमारतीच्या आग दुर्घटनेत 7 मुलांसह 13 जणांचा आगीच होरपळून मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील पुर्वेकडील शहर फिलाडेल्फिया येथे बुधवारी सकाळी ही भयावह घटना घडली आहे. फिलाडेल्फियामध्ये असलेल्या N23rd स्ट्रीट येथील 800 ब्लॉकवाल्या तीन मजली इमारतीला अचानक आग लागली होती. त्यामध्ये 7 मुलांसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
फिलाडेल्फियाच्या अग्निशामक दलाचे डिप्टी कमिश्नर यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले असून, इमारतीच्या आतमधून जखमींना बाहेर काढण्यात येत आहे.
स्मोक डिटेक्टर्स खराब असल्याने ही घटना घडली असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. स्मोक डिटेक्टर खराब असल्यामुळे इमारतीत आग लागल्यानंतरही कोणत्याही प्रकारे सुचना न मिळाल्याने, त्यामुळे या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जर वेळेवर सुचना मिळाली असती तर, ही घटना घडली नसती. असे डिप्टी कमिश्नर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे 800 ब्लॉकच्या या इमारतीत फक्त चारच स्मोक डिटेक्टर होते, आणि ते चौघेही खराब होते.
आगीचे ते 50 मिनिटे आगीची सुचना मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाने 50 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मृतांचा आकडा आहे. आठ जणांना अग्निशामक दलाने वाचवले आहे.
कुटुंबातील 26 जण इमारतीत राहायचे आग लागलेल्या या इमारतीत दोन कुटुंबातील एकूण 26 जण राहायचे. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.