आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रशिया आणि चीनचा वाढता धोका बघून अमेरिका पुन्हा एकदा नव्याने अणुबॉम्ब बनवायला लागली आहे. येत्या दहा वर्षांत त्याच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. हे उत्पादन कॅरोलिनामध्ये सवाना नदी किनाऱ्यावरील एका कारखान्यात आणि न्यू मेक्सिकोतील लॉस अल्मोसमध्ये होईल. अमेरिका आणि रशियातील शीतयुद्धाच्या वेळी सवाना नदीवरील कारखान्यात अमेरिकेच्या अण्वस्त्रांसाठी ट्रिटियम आणि प्लुटोनियमचे उत्पादन व्हायचे. २ लाख एकरमध्ये उभारलेल्या या कारखान्यात हजारो लोक काम करायचे. आता येथे ३ कोटी ७० लाख गॅलन रेडिओअॅक्टिव्ह कचरा जमा झाला आहे. ३० वर्षांनंतर आता पुन्हा येथे अण्वस्त्र तयार केले जातील. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाची एक संस्था द नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन (एनएनएसए) येथे अण्वस्त्र तयार करते. संस्थेला वाटते की, सध्याची अण्वस्त्रे खूप जुनी झाली असून त्यांना बदलण्याची गरज आहे. यात कोणतीही अडचण यायला नको कारण नवे तंत्रज्ञान खूप सुरक्षित आहे. लाेकांना भीती आहे की, कारखाना पुन्हा सुरू झाल्यास लोक रेडिएशनच्या तावडीत येतील. ओबामा सरकारच्या कार्यकाळात अमेरिकी काँग्रेस व स्वत: राष्ट्रपती ओबामा यांनी येथे अण्वस्त्र निर्मितीसाठी संमती दिली होती. २०१८ मध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांनी या योजनेला मंजुरी दिली हेाती. त्याअंतर्गत एकूण ८० खड्डे दरवर्षी तयार केले जातील. यातील ५० दक्षिण कॅरोलिनात आणि ३० न्यू मेक्सिकोत असतील. येथे प्लुटोनियमचे फुटबॉलसारखे गोल बनवले जातील जे अण्वस्त्रात ट्रिगरचे काम करतील.
दरम्यान, सुरक्षेसंबंधातील तज्ञ स्टीफन यंग यांचे म्हणणे आहे की, ही योजना केवळ खर्चिकच नव्हे तर धोकादायकही आहे. कारखान्याजवळ राहणारे ७० वर्षांचे पिट लाबर्ज यांचे म्हणणे आहे की, नवे तंत्रज्ञान सुरक्षित असल्याचा अद्याप पुरावा नाही. एनएनएसएचे म्हणणे आहे की, अमेरिका काम थांबवणार नाही, कामात उशीर झाल्यास सुरक्षा धोक्यात येईल तसेच उत्पादन खर्चही वाढेल.
अमेरिकेकडे ७५५० अण्वस्त्रे आहेत
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार अमेरिकेकडे ७५५० अण्वस्त्र आहेत. त्यांनी १७५० अणुबॉम्ब क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा मारा करणाऱ्या विमानात तैनात केले आहेत. रशियावर नजर ठेवण्यासाठी यातील १५० अणुबॉम्ब युराेपात तैनात आहेत. रशियाकडे ६३७५ आणि चीनकडे ३२० अण्वस्त्रे आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.