आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • America Presidential Election : Been A Factor Of Trump's Victory The Last Time, Now I Will Be Sad If Trump Wins

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत अमेरिकेचे 'मतकापू' होवी हॉकिन्स:गतवेळी ट्रम्पच्या विजयाचा फॅक्टर बनले होते, आता म्हणताहेत, माझ्यामुळे ट्रॅम्प जिंकल्यास खेद वाटेल!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प वा बायडेन यांच्यापैकी कुणीही राष्ट्राध्यक्ष बनल्यास जनतेच्या समस्या सुटणार नाहीत : होवी

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत होवी हॉकिन्स हे ग्रीन पार्टीचे उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत ते ट्रम्प यांच्या विजयाचा ‘फॅक्टर’ ठरले होते. त्यांच्या पक्षाला ५० पैकी ४६ राज्यांच्या मतपत्रांत प्रतिनिधित्व प्राप्त आहे. तथापि, यंदा ते ट्रम्प व बायडेन या दोघांच्याही विरोधात आहेत. त्यांच्यानुसार, दोन्ही उमेदवारांचे पक्ष जनहितार्थ कामासाठी सक्षम नाहीत. रितेश शुक्ल यांच्याशी त्यांच्या चर्चेचा संपादित अंश:

> यंदाची निवडणूक डाेनाल्ड ट्रम्प व बायडेन यांच्यावर केंद्रित आहे, या रणधुमाळीत तुमचा पक्ष कुठे आहे?

रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅट, दोन्ही पक्ष कॉर्पोरेट अमेरिका व युद्ध उद्योगांचे पक्षधर आहेत. मीडियाही त्यांचे मुखपत्र बनला आहे. बायडेन व ट्रम्पपैकी अमेरिकेसाठी कोण उत्तम, हा चर्चेचा मोठा मुद्दा आहे. मी म्हणतो, अमेरिका कोण आहे, हेच आधी ठरवले जावे. अमेरिका कॉर्पोरेट आणि युद्ध सामग्रीची व्यापारी असेल तर तो बायडेन उजवे आहेत. कारण त्यांचे वर्तन सभ्य आहे. मात्र धोरणात्मकदृष्ट्या ट्रम्प-बायडेन यांच्यात काहीही फरक नाही.

> ...तर मग तुमच्या मते अमेरिका कोण आहे?

आम्ही भाड्याच्या घरांत राहणारे लोक, मध्यमवर्गीय कुटुंबे, सामान्य सैनिक, मुले, महिला व गरीब आजारी वृद्धांना अमेरिका समजतो, अन् आज दोघेही महान नाहीत. ट्रम्प वा बायडेन यांच्यापैकी कुणीही राष्ट्राध्यक्ष बनले तरी अमेरिकेचे प्रश्न सुटणार नाहीत.

> अशी चर्चा आहे की, तुम्ही डेमाेक्रॅटिक पार्टीची मते खाऊन डोनाल्ड ट्रम्प यांचीच मदत करणार आहात?

ट्रम्प ४० वर्षांपासून कॉर्पोरेट आणि वैयक्तिक गुन्ह्यांनी बरबटलेले आहेत. ट्रम्पसारखी गौरवर्णीय व्यक्तीच गुन्हे करूनही उघडपणे फिरू शकते. आमचा पक्ष वर्णद्वेषी हुकूमशाही प्रवृत्तीच्या ट्रम्प आणि कॉर्पोरेटची तळी उचलणाऱ्या डेमोक्रॅट पक्षाला विरोध करतो. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे लढत आहोत. आमच्या पक्षाला मिळणाऱ्या मतांमुळे ट्रम्प विजयी होणार असतील तर आम्हाला त्याचे खूप दु:ख होईल. ट्रम्प जिंको वा बायडेन, देशाला काहीही फायदा होणार नाही.

> वर्णद्वेष व पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे काम पुरेसे आहे, असे तुम्हाला वाटते का?

प्रत्यक्षात ट्रम्प उघडपणे श्वेतवर्णीय अतिरेक्यांचे समर्थन करतात, तर बायडेन आपल्या धोरणांच्या माध्यमातून वर्णद्वेषाला हवा देत आहेत.

... यासाठी मते खाणार होवी हाॅकिन्स

हॉकिन्स यांची पोहोच ७३% मतदारांपर्यंत आहे. ५३८ पैकी ३८० इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य हॉकिन्स यांना मतदान करू शकतात. बायडेन-ट्रम्पवर नाराज मतदार हॉकिन्सला मते देऊ शकतात.