आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन सेनेतील झटापटीवर अमेरिकेची प्रतिक्रिया:म्हटले- दोन्ही देश लगेच मागे हटले यावर समाधानी

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचलच्या तवांगमध्ये 9 डिसेंबरला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यावर अमेरिकेने म्हटले आहे की, झटापटीनंतर दोन्ही देशांनी लगेचच माघार घेतल्याचा त्यांना आनंद आहे. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली.

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरीन जीन-पियरे यांनी सांगितले की - अमेरिका या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीन लगेचच वेगळे झाले याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही दोन्ही देशांना द्विपक्षीय चॅनलद्वारे चर्चा करण्यास सुचवण्याच्या बाजूने आहोत. भारत आणि चीनने सीमा विवाद सोडवण्यासाठी चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे.

पीयरे यांनी म्हटले आहे की, आम्ही दोन्ही देशांना द्विपक्षीय चॅनलद्वारे चर्चा करण्यास सुचवण्याच्या बाजूने आहोत.
पीयरे यांनी म्हटले आहे की, आम्ही दोन्ही देशांना द्विपक्षीय चॅनलद्वारे चर्चा करण्यास सुचवण्याच्या बाजूने आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

या संघर्षाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 9 डिसेंबर रोजी तवांगमधील यंगस्टे येथे 17 हजार फूट उंचीवरील भारतीय चौकी हटवण्यासाठी 600 चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ते काटेरी काठ्या आणि इलेक्ट्रिक बॅटनने सज्ज होते. भारतीय लष्करानेही त्यांना काटेरी काठ्या आणि रॉडने प्रत्युत्तर दिले. यामध्ये डझनभर चिनी सैनिकांची हाडे मोडली आहेत.

तवांग संघर्षावर जागतिक माध्यमांनी काय म्हटले?

हाँगकाँगचे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टः हाँगकाँगची वेबसाइट द साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने भारतीय लष्कर आणि मीडियाचा हवाला देत झटापटीत 20 भारतीय सैनिक जखमी झाल्याचे लिहिले आहे. बातमीत भारतापेक्षा चीनचे जास्त सैनिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारत आणि अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने या झटापटीबाबत मौन बाळगल्याचे लिहिले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही.

ब्रिटनची बीबीसी: वृत्तसंस्था रॉयटर्सचा हवाला देत बातमी लिहिली आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांत झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. बीबीसीने भारताकडून जखमी झालेल्या सैनिकांची संख्या 6 दिली आहे. चिनी बाजूने या झटापटीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

जर्मनीची DW: एजन्सी आणि भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत बातमी लिहिली. 9 डिसेंबर रोजी विवादित सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांशी भिडले. एएफपीच्या हवाल्याने लिहिले की, चिनी सैनिक सीमेच्या अगदी जवळ आले होते. यानंतर भारतीय जवानांनी यावर प्रतिक्रिया दिली.

पाकिस्तानची डॉन : औली येथे अमेरिकेसोबत झालेल्या लष्करी सरावाला चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचे कारण सांगण्यात आले आहे. पाकिस्तानच्या मीडिया वेबसाइट डॉनने लिहिले आहे की भारत-अमेरिका लष्करी सरावानंतर काही दिवसांनी ही झटापट झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले.

गेल्या वर्षीही 200 चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता

गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये याच भागात 200 चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही भारतीय जवानांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर गस्तीदरम्यान दोन्ही देशांचे सैनिक सीमेवरील वादावर आमनेसामने आले आणि काही तास हा प्रकार चालला. मात्र, यामध्ये भारतीय जवानांना कोणतीही हानी झाली नाही आणि प्रोटोकॉलनुसार चर्चेने वाद मिटवण्यात आला.

गलवानमध्ये झटापट झाली, आपले 20 शहीद झाले, चीनचे 38 मारले गेले

15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यात झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले, तर 38 चिनी सैनिक मारले गेले. मात्र, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केवळ 4 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...