आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत दुर्मिळ घटना:गोम खाण्याच्या प्रयत्नात सापाचा श्वास गुदमरला, दोघांचा जागीच मृत्यू

फ्लोरिडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2007 पासून जगातील लुप्तप्राय प्रजातींच्या यादीत समाविष्ट असलेला रिम रॉक क्राउन्ड स्नेक नावाचा साप नुकताच अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आढळून आला. आश्चर्याची बाब म्हणजे तो विचित्र अवस्थेत मृत आढळून आला. त्याच्या तोंडात गोम दबलेली होती. गोम खाताना श्वास गुदमरल्याने सापाचा मृत्यू झाला. या घटनेचा अभ्यास इकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

ही दुर्मिळ घटना कशी घडली?
रिम रॉक क्राउन्ड साप इतका दुर्मिळ आहे की, तो 2018 मध्ये शेवटचा दिसला होता. आता हा फ्लोरिडाच्या जॉन पेनेकॅम्प कोरल रीफ स्टेट पार्कमध्ये दिसला आहे. येथे फिरणाऱ्या एका व्हिजिटरला हा साप सापडला. त्याने जवळ जाऊन पाहिल्यावर सापाच्या तोंडात गोम असल्याचे दिसले. दोन्ही जीव मृतावस्थेत होते. सापाने डोक्याच्या बाजूने गोम गिळण्याचा प्रयत्न केला. गोम (मिलिपीड्स) कॅरिबियन जायंट सेंटीपीड प्रजातीची होती.

शास्त्रज्ञ थक्क झाले
दोन्ही जीवांना तशाच अवस्थेत तज्ज्ञांकडे नेण्यात आले. यानंतर त्यांचे फोटो आणि एक्स-रेही काढण्यात आले. यामध्ये सापाच्या आतमध्ये गोम खोलवर गेल्याचे दिसून आले, त्यामुळे सापाला श्वास घेता आला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. गोमच्या मृत्यूच्या कारणावर संशोधन सुरू आहे. रिम रॉक क्राउन्ड साप फारच दुर्मिळ आहे, त्यामुळे तो या स्थितीत सापडल्याने शास्त्रज्ञ थक्क झाले.

8 इंच लांब होता साप
तज्ज्ञांच्या मते, हा साप 8 इंच म्हणजेच 20 सेंटीमीटर लांब होता. त्याच्या तोंडात असलेली गोम 2 इंच म्हणजेच 50 मिलीमीटर लांब होती. सापाने ते 27 मिमी पर्यंत गिळले, त्यानंतर त्याचा श्वास गुदमरला. दोन्ही जीवांच्या डिजिटल शवविच्छेदनात हे सर्व आढळून आले.

रिम रॉक क्राउन्ड सापांची संख्या फक्त 26 आहे
शास्त्रज्ञांनी सांगितले की, रिम रॉक क्राउन्ड सापाची प्रजाती इतकी दुर्मिळ आहे की जगात त्यापैकी फक्त 26 आहेत. 1975 पासून, या सापाचा फ्लोरिडाच्या लुप्तप्राय प्रजातींच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्याची लांबी 8 इंचांपेक्षा जास्त नाही. हा साप विषारीही नाही. हे विशेषतः आग्नेय अटलांटिक किनार्‍याजवळ आढळतात. शेवटचा जिवंत साप 2015 मध्ये दिसला होता. 2018 मध्ये सापडलेला साप एका मांजरीने मारला होता.

बातम्या आणखी आहेत...