आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गोळीबाराच्या 3 घटना, 9 जणांचा मृत्यू:2 विद्यार्थीही मारले गेले, दोन दिवसांपूर्वीच लॉस एंजेलिसमधील गोळीबारात 11 ठार

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत गेल्या 12 तासात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. यामध्ये 2 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला.

वाचा - कुठे आणि कधी झाला गोळीबार

कॅलिफोर्नियात पहिला गोळीबार, 7 ठार
सोमवारी उत्तर कॅलिफोर्नियात गनमॅनने गोळीबार केला. या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी आहे. शेरीफच्या अहवालानुसार, हाफ मून बे मध्ये गोळीबाराची घटना घडली. यातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुसरी घटना : आयोवामध्ये 2 विद्यार्थी ठार
विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेतील मुलांवर एका हल्लेखोराने गोळीबार केला. यात 2 विद्यार्थी ठार झाले. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. तर जखमीतील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जेव्हा शाळेत एक कार्यक्रम सुरू होता तेवढ्यात हा गोळीबार झाला. पोलिसांनी सांगितले की, गोळीबारानंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण अद्यापही फरार आहे.

सॅन फ्रान्सिस्कोत तिसरा गोळीबार
साउथसाइड भागातील एका फार्मजवळ गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. यात काय नुकसान झालेले आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लॉस एंजेलिसमध्ये एकाने स्वतःवर गोळी झाडली
लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियामध्ये 21 जानेवारी रोजी झालेल्या सामूहिक गोळीबार प्रकरणातील एका 72 वर्षीय संशयिताचा पोलिसांना मृतदेह व्हॅनमध्ये सापडला. लॉस एंजेलिस टाईम्सनुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी हल्लेखोराने मॉन्टेरी पार्क परिसरात अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांत 5 महिलांचा समावेश आहे. येथील एका डान्स हॉलमध्ये चंद्र नववर्षाचे सेलिब्रेशन सुरू असताना हा हल्ला झाला.

बातम्या आणखी आहेत...