आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • America UK's New Normal Plan Corona Is Not Eliminated, Better Preparedness For Competition; There Will Be No Lockdown | Marathi News

अमेरिका-ब्रिटन:न्यू नॉर्मल प्लॅन; लॉकडाऊन नाहीच, शाळाही सुरू राहणार, ब्रिटनमध्ये रुग्णालयांसाठी 5 लाख कोटी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या सामन्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनच्या सरकार आणि शास्त्रज्ञांनी नवा न्यू नॉर्मल प्लॅन तयार केला आहे. विषाणूने प्रभावित दोन्ही देशातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आता जवळपास दोन वर्षे विषाणूचा सफाया करण्याचा विचार सोडला पाहिजे. त्याऐवजी विषाणूचा सामना करण्यासाठी चांगली रणनीती आखायला हवी. अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेनसाठी त्यांचे सल्लागार राहिलेल्या तीन शास्त्रज्ञांनी एक अहवाल तयार केला आहे. तिकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅनसनसाठी अर्थमंत्री ऋषी सुनाक आणि शिक्षणमंत्री नदीम जाहावी यांनी अहवाल तयार केला आहे. दोन्ही देशांनी तयार केलेल्या अहवालांत लॉकडाउनच्या शक्यता फेटाळत लस आणि तपासण्यांवर भर दिला आहे. सोबतच ब्रिटन आणि अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालये सध्याच बंद न करण्याचा निर्णयही घेतला गेला. आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर जोर दिला जात आहे. ब्रिटनमध्ये पाच लाख कोटी अतिरिक्त जारी करण्यात आले आहेत.

दोन्ही देशांत ओमायक्रॉनमुळे सुरुवातीला आलेली रुग्णवाढ आता कमी होत आहे. अमेरिकेत जेथे आठवडाभरापूर्वी सुमारे ७ लाख रुग्ण आढळत होते, तेथे रविवारी तीन लाख रुग्णच आढळले. अशाच प्रकारे ब्रिटनमध्ये ४ जानेवारीला एका दिवसात रेकॉर्ड २.१८ रुग्ण आढळले होते. तेथे हा आकडा उतरता आहे.

अमेरिका : आयसोलेशन काळ १० वरून ५ दिवस
- आता ६२ टक्के लाेकसंख्येला दोन्ही डोस, एप्रिलपर्यंत ८०% चे लक्ष्य.
- ५० कोटी टेस्टिंग किटचे देशभरात मोफत वितरण केले जाईल.
- नेझल लसींची संख्या आणि वापर वाढवण्यावर भर.
- शिकागो वगळता अजून कोणत्याच राज्याने शाळा बंद केल्या नाहीत.
- क्वाॅरंंटाइनचा काळही घटवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

जर्मनी : डबल डोसनंतर सार्वजनिक ठिकाणांवर परवानगी
- इस्रायल : आपल्या सर्व नागरिकांना सर्व देशांत प्रवास करण्याची मुभा.
- थायलंड : लॉकडाउनला नकार., क्वाॅरंटाइन-आइसोलेशन काळात घट.
- सिंगापूर: १० आफ्रिकी देशांवर लावलेले प्रवास निर्बंध हटवले
- नेदरलँड: १४ जानेवारीपासून सर्व प्रवासावरील निर्बंध हटवले जाणार.

ब्रिटन : घटते रुग्ण, चौथ्या डोसचा अजून विचार नाही
- सलग रुग्ण घटत आहेत. बूस्टरनंतर चौथा डोस देण्याचा विचार नाही.
- तपासण्या वाढवण्यासाठी दाट वस्त्यांत प्रत्येक किमीवर सेंटर
- आयसोलेशन काळ १० वरून५ दिवस केला जणार आहे.
- ब्रिटनमध्ये सध्या शाळा बंद करण्याविषयीची घोषणा नाही.
- २६ जानेवारीला पीएम बैठकीत उर्वरित निर्बंधांत सूट देण्याचा निर्णय.

बातम्या आणखी आहेत...