आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • America UK's New Normal Plan Corona Is Not Eliminated, Better Preparedness For Competition; There Will Be No Lockdown, Schools Will Remain Open

ओमायक्रॉनमुळे अमेरिका अडचणीत:रुग्णालयांमध्ये मागच्या लाटेपेक्षाही जास्त रुग्ण दाखल, सर्वाधिक 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कहर वाढत आहे. येथे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने गेल्या लाटेच्या पीकचा विक्रम मोडला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्विसेसने सांगितले की, रविवारी देशातील रुग्णालयांमध्ये 1,42,388 संक्रमित दाखल होते. तर गेल्या लाटेत पीकमध्ये 14 जानेवारीला 1,42,315 रुग्णच रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते.

चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांच्या सरासरीपेक्षा 83% जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. दाखल झालेले बहुतांश रुग्ण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 60 वर्षांवरील रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही कमी आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या एकूण रूग्णांमध्ये अशा लोकांचाही समावेश आहे जे इतर काही आजारांवर उपचारासाठी आले होते आणि त्यांना तपासणीदरम्यान संसर्ग झाल्याचे आढळून आले.

यूएस-यूकेचा न्यू नॉर्मल प्लान
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन सरकारच्या शास्त्रज्ञांनी एक न्यू नॉर्मल प्लान तयार केला आहे. व्हायरसने बाधित दोन्ही देशांचे शास्त्रज्ञ मानतात की, आता जवळपास दोन वर्षांनंतर व्हायरस नष्ट करण्याचा विचार संपवावा लागेल. त्याऐवजी, व्हायरसचा सामना करण्यासाठी अधिक चांगली रणनीती बनवावी लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासाठी त्यांचे सल्लागार असलेल्या तीन शास्त्रज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे.

ब्रिटनमध्ये लॉकडाऊन नाही, टेस्टिंगवर भर
ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसरन यांच्यासाठी अर्थमंत्री ऋषी सुनाक आणि शिक्षणमंत्री नदीम जाहावी यांनी रिपोर्ट बनवला आहे. दोन्ही देशांमध्ये तयार करण्यात आलेल्या अहवालात लॉकडाऊनची भीती फेटाळून लावत लस आणि चाचणी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ब्रिटन आणि अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालये तूर्तास बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

यूकेमध्ये रुग्णालयांसाठी 5 लाख कोटी
यूकेमध्ये अतिरिक्त 5 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. यूएस आणि यूकेमध्ये ओमायक्रॉनमुळे, सुरुवातीच्या टप्प्यात प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीत आता घट होत आहे. अमेरिकेत, जिथे आठवड्याभरापूर्वी सुमारे 7 लाख केसेस येत होत्या, तिथे रविवारी फक्त तीन लाख केसेस होत्या. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये, जिथे 4 जानेवारी रोजी एका दिवसात विक्रमी 2.18 लाख प्रकरणे समोर आली होती, आता हा आकडा दिवसेंदिवस घसरत आहे. रविवारी ब्रिटनमध्ये कोरोनाचे 1.41 लाख नवीन रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...