आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • America | Workers | Office In The United States, Employees Began Returning To The Office; It Is Unknown At This Time What He Will Do After Leaving The Post

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेत कर्मचारी कार्यालयात परतू लागले; कर्मचाऱ्यांना सहकारी कार्यालयात येणार की नाही ठाऊक नसते

एमा गोल्डगर्ब17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात रिमोट वर्कच्या पद्धतीत वाढ झाली. अमेरिकेत मे २०२० दरम्यान सर्वाधिक ३५ टक्के कर्मचारी रिमोट वर्किंग करत होते. म्हणजेच कार्यालयात येत नसत. परंतु थंडीला सुरुवात होताच केवळ ११ टक्के कर्मचारी रिमोट वर्किंग करू लागले आहेत.

म्हणजेच हे कर्मचारी कार्यालयात येत नाहीत. परंतु सामान्यपणे आता कर्मचारी कार्यालयात परतू लागले आहेत. त्यास ग्रेट ऑफ रिआेपनिंग असे नाव देण्यात आले आहे. सुमारे ५० टक्के कर्मचारी वर्क फ्रॉमहून परतले.

कोरोनाकाळात अनेक मोठ्या कंपन्यांनी रिमोट वर्कला लागू केले आहे. परंतु परिस्थितीत बदल झाल्याने कार्यालयात संभ्रमाची स्थिती तयार होत आहे. एचआर कंपनीचे कॅरन कोच म्हणाले, हायब्रिड वर्कमुळे कर्मचाऱ्यांना सहकारी कार्यालयात येणार आहे किंवा नाही याची काही कल्पना नसते. एक उद्योजक क्रिस हर्ड म्हणाले, हायब्रिड वर्क भविष्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन यासंबंधीचे धोरण ठरवावे.

कोरोनानंतर रिमोट वर्कमुळे तीन श्रेणीसाठी धोरण ठरवणेही कंपन्यांसाठी कठीण

कंपन्यांना आता तीन श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. वर्क फ्रॉम होम, रिमोट वर्क व हायब्रिड वर्क इत्यादी धोरणे बनवावी लागत आहेत. भत्ते प्रवास इत्यादीच्या आधारे निश्चित केले जातात. त्यामुळे कोणता कर्मचारी येणार आहे ? किंवा कोण येणार नाही? याची इतरांना कल्पना नसते.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी हायब्रिड व रिमोटविरोधी सूर आळवला आहे. कोरोनाकाळात व्हर्च्युअल बैठक आणि कार्यसंस्कृतीशी तडजोड करण्यात आली. परंतु त्यांना हायब्रिड सेवा देणाऱ्यांसोबत काम करताना अडचणी येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...