आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको सीमेकडून जास्त भर:आता व्हिसाप्रकरणी अमेरिकीकाँग्रेसमध्ये होणार सुनावणी

वॉशिंग्टनहून भास्करसाठी यशवंत राजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी काँग्रेस आता व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेतील विलंबाबाबत सुनावणी करण्याची योजना आखत आहे. विशेषत: भारतीयांच्या प्रकरणात व्हिसात होणारा उशीर आता खूप वाईट स्थितीत पोहोचला आहे. काँग्रेसच्या सदस्यांनुसार, दक्षिण सीमेवर मेक्सिको आणि अन्य देशांच्या सीमेवर स्थलांतरितांच्या समस्येकडे जास्त लक्ष आणि बजेटमुळे भारताच्या व्हिसा प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्रस्त भारतीय अधिकाऱ्यांनी बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या मुद्दयावर बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत हा मुद्दा उपस्थित केला आहे. दुसरीकडे, हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हचे रिपब्लिकन सदस्य माइक वाल्ट्झ म्हणाले, आम्ही विदेश मंत्रालयातील अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.

विशेषत: व्हिसा प्रकरणात त्यांचे बजेट आदी संदर्भातील आहे. दक्षिणेत मेक्सिको आणि अन्य देशांसोबतच्या सीमा मुद्दयांमुळे भारतीयांच्या व्हिसा प्रक्रियेवर परिणाम होण्याच्या प्रश्नावर वाल्ट्झ म्हणाले, अर्थसंकल्पाचा काही भाग दुर्दैवाने दक्षिण सीमेवर गेला. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. मात्र, तो मान्य केला जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम होत आहे.

मेक्सिको सीमा नव्हे, कोविडमुळे विलंब
अमेरिकी विदेश विभाग व्हिसा प्रक्रियेतील विलंबाचे कारण कोविड असल्याचे सांगतात. त्या वेळी जगभरात दूतावास सेवा बंद करावी लागली होती. यामुळे अर्ज जमा होत गेले. मात्र, अर्जांच्या निपटाऱ्यासाठी अतिरिक्त स्टाफ लावावा लागला. भारतीयांचे अर्ज भारतासोबत वॉशिंग्टनमध्येही प्रोसेस केले जात आहेत. विदेश िवभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही भारतात प्रतीक्षा अवधी कमी करण्यात खूप जास्त स्रोत लावत आहोत. व्हिजिटर व्हिसासाठी १ एप्रिलला प्रतीक्षा अवधी २ महिन्यांहून कमी झाला आहे. हा ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत निम्मा आहे.