आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:180 वर्षे जगण्याचा दावा करत अमेरिकन उद्योजकाने केले बायोहॅकिंग, शरीरातून स्टेम सेल काढून पुन्हा घेतले टोचून

न्यूयॉर्क23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्हातारपण रोखण्यासाठी जेवणावर नियंत्रण व क्रायोथेरेपी घेणाऱ्या उद्योजकाची नवी युक्ती

अमेरिकन उद्योजक आणि न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्टसेलिंग लेखक डेव्ह अॅस्प्रे यांनी त्यांच्या शरीराच्या बोनमॅरोतून स्टेम सेल काढून त्यांचे पुन्हा प्रत्यारोपण केले. १८० वर्षे जगण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे शरीराचे जैविक घड्याळ उलटे फिरवण्यासाठी बायोहॅकिंग करण्यात आले. त्यांचा दावा आहे की, ही पद्धत भविष्यात मोबाइल फोनसारखी प्रचलित होईल. ४७ वर्षांचे डेव्ह यांना २१५३ पर्यंत जगायचे आहे. यासाठी ते कोल्ड क्रायोथेरेपी चॅम्बर आणि विशेष उपवास पद्धतीचाही वापर करत आहेत.

डेव्ह यांना वाटते की, जर ४० पेक्षा कमी वय असणाऱ्यांनी ही पद्धत स्वीकारली तर १००व्या वर्षीही ते ‘आनंदी आणि विशेष क्रियाशील’ राहू शकतील. शरीराची पूर्ण कार्यप्रणाली चांगली राहावी म्हणून डेव्ह यांनी अशा तंत्रांवर ७.४ कोटी रुपये खर्च केले आहेत. ते सांगतात, मी भाेजनावर नियंत्रण, झोपण्याची पद्धत बदलवून आणि म्हातारपण राेखण्याचे इतर उपचार करून स्वत:ला असे बनवले आहे की, शरीरात कमीत कमी जळजळ (इन्फ्लेमेशन) व्हावे. स्टेम सेलचे प्रत्यारोपण करण्याबाबत डेव्ह यांनी सांगितले की, जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा शरीरात कोट्यवधी स्टेम सेल असतात. वाढत्या वयाबरोबर स्टेम सेल नष्ट होऊ लागतात. यासाठी मी इंटरमिटेंट फास्टिंग (ठराविक अंतराने जेवण आणि उपवास) करतो. यात जेव्हा शरीर जेवणाचे पचन करत नसते तेव्हा ते स्वत:ची काळजी घेत असते. क्रायोथेरेपीवरही डेव्ह यांचा विश्वास आहे. ते कोल्ड थेरपी नावाने ओळखले जाते. ही शरीरातील क्षतिग्रस्त ऊतींच्या कमी तापमानावर उपचार करण्याची प्रक्रिया आहे. विशेष म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मार्क अॅलन यांनी स्टेम सेलद्वारे वयाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी इलवियन कंपनी स्थापन करून कामाला सुरुवात केली आहे. हार्वर्डच्याच स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह बायोलॉजी प्रा. अॅमी वॅगर्सदेखील प्रोटीनचा कशा पद्धतीने वयावर परिणाम होतो याबाबत संशोधन करत आहेत.

यांची बुलेटप्रूफ कॉफी प्रसिद्ध, वजन कमी करण्यात उपयुक्त
१७ वर्षांपूर्वी तिबेटमध्ये ट्रेकिंग करताना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना याकच्या दुधाचा चहा पाजण्यात आला होता. यामुळे त्यांना नवीन ऊर्जा जाणवली. याच आधारे त्यांनी अमेरिकेत बुलेटप्रूफ कॉफी सादर केली. ती एमसीटी तेल आणि लोण्यापासून बनवली जाते. सकाळी प्यायल्याने वजन कमी होते. डॉ. ट्रुडी डिकीन यांच्यानुसार, सामान्य कॉफीच्या एका कपात ५०० कॅलरी असतात. बुलेटप्रूफ कॉफीत कार्बोहायड्रेट नसतात. ती इन्शुलिनची प्रतिक्रिया होऊ देत नाही. त्यातील तेल चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

बातम्या आणखी आहेत...