आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • American Filmmaker Held Captive By The Taliban Shooting Begins Where Al Zawahiri Was Killed; Suspected Of Being A Spy

अमेरिकन चित्रपट निर्माता तालिबानच्या कैदेत:अल-जवाहिरी मारला गेला त्याठिकाणी शूटिंग सुरु होते; गुप्तहेर असल्याचा संशय

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने अमेरिकन आणि अफगाणी चित्रपट निर्मात्याला ताब्यात घेतले आहे. न्यूयॉर्क स्थित मीडिया वॉचडॉगने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन चित्रपट निर्माते आईवर शियरर आणि अफगाण निर्माता फैझुल्ला फैजबख्श यांना तालिबानने जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे.

17 ऑगस्ट रोजी राजधानी काबूलमधील शेरपूर जिल्हा परिसरात पत्रकार शियरर आणि फैजबख्श यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. याच ठिकाणी झालेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी मारला गेला होता. वृत्तानुसार, तालिबानने या दोघांना कोणत्यातरी गुप्त ठिकाणी ठेवले आहे.

अफगाणिस्तानात पत्रकारांसाठी जगणे कठीण झाले आहे. तालिबान सरकारने गेल्या वर्षभरात 122 पत्रकारांना अटक केली आहे.
अफगाणिस्तानात पत्रकारांसाठी जगणे कठीण झाले आहे. तालिबान सरकारने गेल्या वर्षभरात 122 पत्रकारांना अटक केली आहे.

सुटकेची मागणी

अमेरिकन पत्रकारांनी या संदर्भात कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टसोबत (CPJ) संवाद साधला . त्यानंतर न्यूयॉर्कस्थित मीडिया वॉचडॉगने शियरर आणि फैजबख्श यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

गुप्तहेर असल्याचा संशय

सीपीजेनुसार, काही तालिबानी सुरक्षा रक्षकांनी त्यांना चित्रीकरण करण्यापासून थांबवले होते. त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या चित्रीकरणासाठी लागणारी पूर्वपरवानगी आहे की नाही याची त्यांनी तपासणी केली. त्यांचे ओळखपत्र, पासपोर्ट आणि मोबाईल तपासण्यात आले. तालिबानी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अमेरिकन गुप्तहेर म्हटले. त्यानंतर शियरर आणि फैजबख्श यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती तालिबानच्या गुप्तचर विभागाला दिली. यानंतर 50 सशस्त्र गुप्तचरांनी शियरर आणि फैजबख्श यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना गुप्त ठिकाणी नेण्यात आले.

तालिबानच्या राजवटीत 80 टक्के महिला पत्रकारांनी काम सोडले. 173 पत्रकारांच्या अधिकारांचे उल्लंघन झाले.
तालिबानच्या राजवटीत 80 टक्के महिला पत्रकारांनी काम सोडले. 173 पत्रकारांच्या अधिकारांचे उल्लंघन झाले.

1 महिन्याच्या व्हिसावर अफगाणिस्तानात आले होते शियरर

मिळालेल्या माहितीनुसार, शियरर फेब्रुवारीमध्ये एक महिन्याच्या व्हिसावर अफगाणिस्तानात आले होते. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना शूटिंगसाठी वर्क परमिट दिले होते. गेल्या 40 वर्षांत अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बदलांवर ते डॉक्युमेंट्री बनवत होते. मार्चमध्ये त्यांना एक वर्षाचे वर्क परमिटही देण्यात आले होते. त्यांचा व्हिसा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. शियरर यांना ताब्यात घेण्यापूर्वी तालिबानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अनेक वेळा सतर्क केले होते. त्यांना आधीच शियरर यांच्यावर संशय होता.

बातम्या आणखी आहेत...