आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाशक्तीची नाचक्की:ट्रम्प यांच्या बडतर्फीचे वारे जाेरात, दंगेखोरांवर दाखल होणार खटले

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 232 पैकी 100 रिपब्लिकन खासदारांनी हिंसेसाठी ट्रम्प यांनाच जबाबदार ठरवले

डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. अमेरिकी संसद भवनातील हिंसेनंतर ट्रम्पविरुद्ध विरोधक डेमोक्रॅट व स्वपक्ष रिपब्लिकन पार्टीचेही खासदार एकवटले आहेत. २३२ पैकी १०० रिपब्लिकन खासदारांनी हिंसेसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरले.

सभापती नॅन्सी पेलोसी व सिनेटमधील डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते चक शूमर यांनी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्याकडे ट्रम्प यांच्या पदच्युतीची मागणी केली. पुढील आठवड्यात महाभियाेग चालू शकतो, असे उपसभापती कॅथरीन क्लार्क म्हणाल्या. ट्रम्प यांना २५ व्या घटनादुरुस्तीअन्वयेही हटवण्याची चर्चा आहे. दरम्यान, ट्रम्प म्हणाले, बायडेन शांततापूर्ण पद्धतीने २० जानेवारीला पद ग्रहण करतील. मात्र आपण सोहळ्यास उपस्थित राहणार नाही. पोलिस दंगेखोरांवर देशद्रोहाचा खटला चालवण्याच्या तयारीत आहेत.

दोन मार्ग... पण बडतर्फीची कारवाई केवळ १२ दिवसांत होणे आव्हानच
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना महाभियोग आणि घटनेतील २५व्या दुरुस्तीनुसार बडतर्फ करता येते. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडींच्या हत्येमुळे १९६७ मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली. यानुसार उपराष्ट्राध्यक्षांना राष्ट्राध्यक्षांचे अधिकार मिळतात.

लवकर पूर्ण होणे कठीण
प्रथम ६ हाऊस कमिटी पडताळणी करून न्यायिक समितीकडे शिफारस करेल. ती स्वीकारली तर मतदान होईल. पक्षात मतदान झाले तर महाभियोग चालेल. यानंतर सिनेट ट्रायल, मतदान होईल. दोन तृतीयांश मते मिळाली तरच ट्रम्प बडतर्फ होतील. डिसेंबर २०१९ मध्ये ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालला, पण सिनेटने निर्दाेष जाहीर केले. ट्रम्प यांच्यावर देशद्रोह व घटनेचा अवमान हे आरोप लावले गेले तरी प्रक्रिया १२ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता कमीच.

२१ दिवसांत मतदान
उपराष्ट्राध्यक्षांची मंजुरी व कॅबिनेटच्या बहुमताआधारे राष्ट्राध्यक्ष सक्षम नाहीत, हे घोषित केले जाऊ शकते. राष्ट्राध्यक्षांनी मानले नाही तर उपराष्ट्राध्यक्ष ४८ तासांत काँग्रेसची बैठक बोलावतील. नंतर काँग्रेसला २१ दिवसांत दोन तृतीयांश बहुमताने यास मंजुरी द्यावी लागेल. हा कालावधी ट्रम्प यांच्या १२ दिवसांच्या कालावधीपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे या कायद्यात राष्ट्राध्यक्ष सक्षम नसल्याचे घोषित करण्यासाठी काय अटी असाव्यात हेच स्पष्ट नाही.

आता ट्रम्प म्हणतात... बायडेन यांच्या शपथविधीला जाणार नाही
व्हेटो पॉवरमुळे स्वत:लाही माफ करू शकतात ट्रम्प : व्हेटो पॉवरने ट्रम्प स्वत:ला माफी देऊ शकतात. असे झाल्यास ते स्वत:ला माफ करणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असतील. न्याय विभागाच्या कायदेशीर मेमोनुसार राष्ट्राध्यक्ष स्वत:ला माफी देऊ शकत नाही. राजीनामा देऊन उपराष्ट्राध्यक्षांकडे कार्यभार सोपवून माफीचा आग्रह करू शकतात. मात्र तसे करण्याची सक्ती नाही.

बातम्या आणखी आहेत...