आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनेक चढ-उतार आणि मोठ्या संघर्षानंतर बुधवारी जो बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या सोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही पहिल्या अमेरिकी महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. कोरोना तसेच अनेक देशांतर्गत आणि बाहेरच्या आघाड्यांवर संघर्ष करणाऱ्या अमेरिकेला नवी दिशा देण्यासाठी बायडेन यांनी त्यांच्या मोठ्या मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे. बायडेन यांच्या मंत्रिमंडळात ट्रम्प यांच्या तुलनेत तरुण, महिला (५०%), कृष्णवर्णीय व अनुभवी (९५%) लोक खूप आहेत. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात पुरुष, श्वेत, वयस्कर आणि कमी अनुभवी जास्त होते. बायडेन यांनी त्यांच्या पहिल्या १०० दिवसांचे महत्त्वाचे ध्येय ठेवले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी १४३ जणांना क्षमादान केले. यात त्यांचे माजी मुख्य रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांचेही नाव आहे. यात ७३ जणांना माफ करण्यात आले असून ७० जणांची शिक्षा कमी करण्यात आली आहे. माफी मिळालेल्यांमध्ये रॅपर लिल वेन, रिपब्लिकन पक्षाचे रेजर इलियट ब्रोइडी आणि डेट्रॉयडचे माजी महापौर किलपॅट्रिक यांची प्रमुख नावे आहेत.
जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्या तुलनेत त्यांच्या मंत्रिमंडळात जास्त वैविध्य ठेवले आहे. बायडेन सरकारमध्ये ५० टक्के महिला व अर्धे कृष्णवर्णीय आहेत. त्यांची ९५ टक्के टीम शासकीय कामाचा अनुभव असणारी आहे. सरासरी वयही ५५ ते ६० दरम्यान आहे.
बायडेन टीममध्ये प्रमुख भारत वंशाचे
> नीरा टंडन : डायरेक्टर ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट
> डॉ. विवेक मूर्ती : अमेरिकी सर्जन जनरल
> वनिता गुप्ता : असोसिएट अॅटर्नी जनरल, डीआेजे
> उज्रा जेया : अंडर सेक्रेटरी, स्टेट फॉर सिव्हिलियन सेक्युरिटी
> सबरीना सिंह : व्हाइट हाउस डेप्युटी प्रेस सेक्रेटरी
> माला अडिगा : फर्स्ट लेडी जिल यांच्या पॉलिसी डायरेक्टर
> गरिमा वर्मा : फर्स्ट लेडी यांच्या डिजिटल डायरेक्टर
> आयशा शहा : पार्टनरशिप मॅनेजर, डिजिटल स्ट्रॅटजी > समिरा फजिली : डेप्युटी डायरेक्टर, एनईसी, व्हाइट हाउस
> गौतम राघवन : डेप्युटी डायरेक्टर, व्हाइट हाउस
> विनय रेड्डी: डायरेक्टर, स्पीच रायटिंग
> वेदांत पटेल : व्हाइट हाउस, लोअर प्रेस
> तरुण छाबडा : सिनियर डायरेक्टर, टीअँडएनएस
> सुमोना गुहा : सिनियर डायरेक्टर फॉर साउथ एशिया
> शांती कलाथिल : कोऑर्डिनेटर फॉर डेमोक्रसी-ह्युमन राइट्स
> सोनिया अग्रवाल : अॅडव्हायझर, क्लायमेट पॉलिसी
> नेहा गुप्ता : असोसिएट कौन्सिल
बायडेन यांनी शपथग्रहणाच्या वेळीच जवळपास २०० जणांची सर्वात मोठी टीम बनवली
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शपथग्रहणावेळीच जवळपास २०० जणांची मोठी टीम बनवली आहे. त्यांच्या आधीच्या चार राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत बायडेन यांनी लवकर पूर्ण मंत्रिमंडळ तयार केले. याचे मुख्य कारण कोरोना म्हटले जात आहे. बायडेन यांना त्यांच्या पहिल्या १०० दिवसांतील महत्त्वाची ध्येय पूर्ण करायची आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.