आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • American Scientists Identify Existing Drug That Could Prevent Covid 19 Replication In Host Cells Says Chicago University Study

संशोधकाना महत्वपूर्ण यश:शरीरातील कोरोना विषाणूची वाढ रोखण्यासाठी औषध सापडले, अॅब्सेलेन नावाचे औषध सुरक्षित, यात इतर तीन वैशिष्ट्ये देखील आहेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅब्सेलेन नावाचे औषध मानवांसाठी सुरक्षित, त्यात अँटीवायरल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेटिव्ह सारखी वैशिष्ट्ये

अमेरिकन संशोधकांना अशा औषधाचा शोध लावला जे संसर्गानंतर शरीरातील कोरोना विषाणूच्या संख्येत होणारी वाढ रोखू शकेल. हे औषध आधीपासूनच अस्तित्वात आहे. याचा उपयोग आता कोरोनावर उपचार करण्यासाठी केला जाईल. अॅब्सेलेन असे या औषधाचे नाव आहे. बायपोलर डिसऑर्डर आणि ऐकण्याची क्षमता घटण्याच्या उपचारात याचा उपयोग केला जातो.

अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने या औषधावर नवीन संशोधन केले आहे. संशोधकांनुसार, या औषधामुळे शरीरात कोरोना विषाणूंची संख्या वाढवणाऱ्या एंजाइमांवर नियंत्रण ठेवता येते.

रुग्णाची प्रकृती गंभीर होण्यापासून रोखली जाईल

सायन्स अ‍ॅडव्हान्सस या जर्नलमधील प्रसिद्ध संशोधन अहवालानुसार, एम-प्रो नावाचे एंजाइम कोरोना व्हायरसला रिप्लीकेट (व्हायरसची संख्या वाढणे) होण्यापासून रोखण्यात अत्यंत उपयुक्त आहे. हाच RNA कोरोनाचा स्पाइक प्रोटीन बनवते. कोरोना एम-प्रो एंजाइमच्या मदतीने शरीरात संख्या वाढवते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते. आता संशोधक याच एंजाइमला नियंत्रिक करून उपचार करणार आहेत.

हे औषध कोरोनाविरूद्ध एखाद्या शस्त्रासारखे असेल

संशोधक जुआन डी-पॅब्लोनुसार, टीमने ज्या औषधाचा शोध घेतला ते कोरोनाच्या एंजाइम एम-प्रो विरोधात एखाद्या शस्त्रासारखे काम करेल. याला नियंत्रित करण्यासाठी अॅब्सेलेन नावाच्या रसायनाचा उपयोग होईल. या औषधात अँटीवायरल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेटिव्ह सारखी वैशिष्ट्ये आहेत. याद्वारे पेशी नष्ट होण्यापासून थांबवता येईल. याचा उपयोग आधीपासूनच बायपोलर आणि हिअरिंग लॉस सारख्या आजारांमध्ये केला जात आहे. या रोगांच्या उपचारांमध्ये हे औषध खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

कोरोनाच्या बाबतीत औषध दोन प्रकारे कार्य करते

संशोधकांनुसार, अॅब्सेलेन मानवासाठी सुरक्षित असल्याचे क्लिनिकल चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. आता आता हे कोरोनाच्या उपचारात वापरले जाऊ शकते.

संशोधकांनुसार, सध्या ते कोरोनाचे ते प्रोटीन्स शोधत आहेत जे संक्रमित व्यक्तीची प्रकृती नाजुक बनवतात. याद्वारे, विषाणूंच्या नवीन धोक्याचा शोध घेऊन त्यावरील उपचार शोधले जातील.

बातम्या आणखी आहेत...