आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • American Soldiers Are Handling Afghan Children At The Airport, Doing Duty With Newborns In Their Arms; News And Live Updates

काबूल विमानतळाचे 10 फोटो:अफगाणी मुलांना सांभाळताना दिसून आल्या अमेरिकेच्या महिला सैनिक, विमानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची अशी घेत आहेत काळजी

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे सर्व फोटो अफगाणिस्तानाची राजधानी काबूल विमानतळावरील आहेत.

अफगाणिस्तानाचा तालिबान्यांनी ताबा घेताच परिस्थिती नियत्रंणाबाहेर गेली आहे. काबूल विमानतळावरुन चित्तथरारक फोटो समोर येत आहे. दरम्यान, विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसून लोक प्रवास करत आहे. आतापर्यंत यामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांचा विमानातून पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे काबूल विमानतळावर सध्याही अमेरिकन सैन्यांचा पहारा आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत काबूल विमानतळावरून दोन दिवसांपूर्वी एका मुलाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक अफगाणी नागरिक आपल्या मुलाला काटेरी तारेवर धरून आणि एका अमेरिकन सैनिकाला देताना दिसत आहे. हे मूल आजारी असून अमेरिकन सैनिकांनी त्याच्यावर विमानतळावर उपचार करत त्यांच्या वडिलाला परत केले असे एका माहितीतून समोर आले आहे.

सैन्यांकडून केले जात आहे मुलांचे सांभाळ
अमेरिका आणि इतर देशांचे सैनिक तालिबान्यांना घाबरणाऱ्या अफगाण मुलांची काळजी घेत नाहीत, तर त्यांच्यासोबत खेळून त्यांचे स्मीतहास्य परत करत आहे. दरम्यान, महिला आणि पुरुष सैनिकदेखील नवजात मुलांना त्यांच्या मांडीवर ठेवून आपले कर्तव्य अतिशय चोखपणे बजावताना दिसत आहेत. हे सर्व फोटो अफगाणिस्तानाची राजधानी काबूल विमानतळावरील आहेत.

अमेरिकन सैनिक काबूल विमानतळाच्या आत लोकांना नेण्यात गुंतले आहेत. दरम्यान, त्यांना वेळ मिळाला की अफगाणी मुलांसोबत खेळतानाही दिसत आहेत.
अमेरिकन सैनिक काबूल विमानतळाच्या आत लोकांना नेण्यात गुंतले आहेत. दरम्यान, त्यांना वेळ मिळाला की अफगाणी मुलांसोबत खेळतानाही दिसत आहेत.
अनेक अफगाणी विमानतळाबाहेर अडकले आहेत, परंतु त्यांनी तालिबान्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्या मुलांना अमेरिकन सैन्याकडे सुपूर्द केले आहेत. अमेरिकन सैनिक नवजात बाळाचा सांभाळ करतानाचा फोटो.
अनेक अफगाणी विमानतळाबाहेर अडकले आहेत, परंतु त्यांनी तालिबान्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्या मुलांना अमेरिकन सैन्याकडे सुपूर्द केले आहेत. अमेरिकन सैनिक नवजात बाळाचा सांभाळ करतानाचा फोटो.
महिला सैनिक विमानतळावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याचबरोबर अफगाण मुलांची काळजीदेखील घेत आहेत. मुलांच्या खाण्यापिण्यापासून ते औषधांपर्यंत काळजी घेतली जात आहे.
महिला सैनिक विमानतळावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याचबरोबर अफगाण मुलांची काळजीदेखील घेत आहेत. मुलांच्या खाण्यापिण्यापासून ते औषधांपर्यंत काळजी घेतली जात आहे.
कित्येक तास उभे राहून आणि परिस्थितीवर लक्ष ठेवूनही सैनिक नवजात बालकांना आपल्या हातात धरून आहेत.
कित्येक तास उभे राहून आणि परिस्थितीवर लक्ष ठेवूनही सैनिक नवजात बालकांना आपल्या हातात धरून आहेत.
विमानतळावर लोक त्यांच्या फ्लाइटची वाट पाहत आहेत. त्यांच्या मुलांना खाण्यापिण्याच्या कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ नये याचीदेखील काळजी घेतली जात आहे.
विमानतळावर लोक त्यांच्या फ्लाइटची वाट पाहत आहेत. त्यांच्या मुलांना खाण्यापिण्याच्या कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ नये याचीदेखील काळजी घेतली जात आहे.
तालिबान्यांचा प्रचंड भीती वाटणारी अफगाण मुले अमेरिकन सैनिकांच्या सावलीत सुरक्षित वाटू लागली आहेत. कोणताही संकोच न करता त्यांच्याकडून अन्न आणि पेय घेत आहेत.
तालिबान्यांचा प्रचंड भीती वाटणारी अफगाण मुले अमेरिकन सैनिकांच्या सावलीत सुरक्षित वाटू लागली आहेत. कोणताही संकोच न करता त्यांच्याकडून अन्न आणि पेय घेत आहेत.
विमानतळाच्या आत मुलाला नेण्यास मदत करताना यूएस, यूके आणि तुर्कीचे सैनिक.
विमानतळाच्या आत मुलाला नेण्यास मदत करताना यूएस, यूके आणि तुर्कीचे सैनिक.
अमेरिकन सैनिक फक्त मुलांना मदत करत नाहीत तर त्यांना स्वतःच्या हाताने पाणी देत आहेत.
अमेरिकन सैनिक फक्त मुलांना मदत करत नाहीत तर त्यांना स्वतःच्या हाताने पाणी देत आहेत.
तालिबानची अत्यंत भीती वाटणारी अफगाण कुटुंबे अमेरिकन सैनिकांपर्यंत पोहचताच हसत आहेत.
तालिबानची अत्यंत भीती वाटणारी अफगाण कुटुंबे अमेरिकन सैनिकांपर्यंत पोहचताच हसत आहेत.
बातम्या आणखी आहेत...