आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन तरुणांमध्ये ऑनलाईन ड्रग्जची तस्करी प्राणघातक ठरत आहे. यूएस इन्स्टिट्यूट सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एक लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला.
तरुण मंडळी नशेसाठी घातक व्यसनाधीन फेंटॅनाइलच्या गोळ्या घेत आहेत. मेडिकल स्टोअर्सवर या गोळ्या खरेदीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र, असे असतानाही माफिया स्नॅपचॅट, टिकटॉक आणि इतर अॅप्ससारख्या सोशल मीडिया साइटद्वारे टॅब्लेटची विक्री करतात. या सोशल मीडिया साइट्सवर खरेदीदार आणि विक्रेता दोघेही एकमेकांना शोधू शकतात.
मॉर्फिनपेक्षा फेंटॅनाइल 100 पट जास्त घातक
प्रयोगशाळेत तयार केलेले फेंटॅनाइल हेरॉईनपेक्षा 50 पट जास्त आणि मॉर्फिनपेक्षा 100 पट जास्त प्राणघातक आहे. ते बनवण्याची प्रक्रिया अतिशय जलद आणि स्वस्त आहे. मेक्सिको, चीन आणि भारतासह काही देशांमध्ये फेंटॅनाइल मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बनवले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.