आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या मार्था वाइनयार्डमधील रॉबिन हार्पर महामारीच्या काळात आठवड्यात फक्त एक दिवसच स्नान करत आहेत. ४३ वर्षीय रॉबिन एका प्रीस्कूलमध्ये प्रशासकीय सहायक आहेत. त्यांनी सांगितले की, ‘कोरोनाने आम्हाला घरात कैद केले आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला. तसाही हा ट्रेंड पर्यावरणासाठी चांगला, व्यवहार्य मानला गेला, त्यामुळे आम्ही त्याचा अवलंब करत आहोत. आता मी पुन्हा शाळेत जात आहे. शाळेत असताना शरीरातून दुर्गंध आला असता तर विद्यार्थ्यांनी तसे स्पष्ट सांगितले असते. त्यामुळे मी हा नित्यक्रम पुढेही सुरू ठेवणार आहे.’ आठवड्यात एकदाच स्नान करणाऱ्या रॉबिन एकट्याच नाहीत. अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये महामारीनंतर हा ट्रेंड सुरू झाला आहे.
महामारीमुळे खाण्या-पिण्याव्यतिरिक्त कपडे घालण्याच्या सवयीवरही परिणाम झाला आहे. मुलांमध्ये तो जाणवत आहे. मुले स्नान करत नाहीत, अशा तक्रारी पालक करत आहेत. ब्रिटनमध्ये युगव्हच्या सर्व्हेनुसार, आपण रोज स्नान करणे बंद केल्याचे १७% लोकांनी मान्य केले आहे. सोशल मीडियावरही अनेक लोकांनी ही गोष्ट मान्य केली आहे. लंडनच्या पर्यावरणतज्ज्ञ डोनाचॅड मॅक्कार्थी याही आठवड्यात एकदा स्नान करतात. १९९२ मध्ये त्या अॅमेझॉनच्या जंगलांत गेल्या होत्या. तेव्हा गरजेपेक्षा जास्त विकास आणि आपल्या सवयींमुळे निसर्गाचे किती नुकसान झाले याची जाणीव त्यांना झाली. त्या म्हणतात, ‘रोज साबणाने स्नान करूनही आपण प्रदूषण वाढवत आहोत.’ आठवड्यात एकदा स्नान करण्याचे फायदेही काही जण सांगतात. अॅशव्हिलेच्या कॅली म्हणाल्या, ‘मला फक्त मुलीला शाळेतून आणायला जावे लागते. रोज कोणाला भेटायचे नसते. मग रोज स्नान करण्याची गरजच काय?’
आठ मिनिटे शॉवर घेण्यासाठी लागते ६४ लिटर पाणी : वाॅटर फंड
कमी वेळा स्नान करावे, असे एस्टनमधील पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापक अँड्रिया आर्मस्ट्राँग यांचे मत आहे. त्या म्हणाल्या की, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या संख्येत लोकांना असा निर्णय घ्यावा लागेल. वॉटर रिसर्च फंडनुसार ८ मिनिटांच्या शॉवरसाठी ६४ लिटर पाणी खर्च होते. ईपीएनुसार, ५ मिनिटे पाणी वाहणे म्हणजे ६० वॅटचा दिवा १४ तास जळण्याएवढे आहे. रोज स्नान करणे आवश्यक नाही, असे अनेक डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनीही म्हटले आहे. त्यामुळे त्याबाबत विचार करायला हवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.