आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोत 4 अमेरिकन लोकांचे किडनॅपींग:ओढून गाडीत टाकले, स्वस्तात औषधे घेण्यासाठी गेले होते, माहिती देणाऱ्याला FBI देणार 40 लाख

वॉशिंग्टन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकोला गेलेल्या अमेरिकेतील चार जणांचे शुक्रवारी (दि.3 मार्च) अपहरण करण्यात आले होते. चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतरही त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर आता अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने मदतीसाठी बक्षीस जाहीर केले आहे. FBI एजन्सी म्हणाली की, जो कोणी अपहरण झालेल्या लोकांची माहिती देईल. त्यांना 40 लाख रुपयांचे बक्षीस म्हणून दिले जाईल.

मेक्सिकोमध्ये झालेल्या अमेरिकन नागरिकांच्या अपहरण प्रकरणाने इतके लक्ष वेधले आहे की, आता व्हाईट हाऊसही त्यावर लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांनी दावा केला आहे की, हे सर्वजण सीमा ओलांडून स्वस्त औषधे खरेदी करण्यासाठी तेथे गेले होते.

चित्रात पांढऱ्या रंगाची व्हॅन दिसत आहे, ज्यामध्ये 4 अमेरिकन लोकांचे अपहरण झालेले प्रवास करत होते.
चित्रात पांढऱ्या रंगाची व्हॅन दिसत आहे, ज्यामध्ये 4 अमेरिकन लोकांचे अपहरण झालेले प्रवास करत होते.

आधी गोळीबार नंतर अपहरण
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकन नागरिक एका पांढऱ्या व्हॅनमधून उत्तर कॅरोलिना येथून मेक्सिकोतील मॅटामोरोसमध्ये दाखल झाले. प्रवेश केल्यानंतर काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यानंतर त्यांना ओढत फरपटत गाडीत बसवले.
आता या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जॉन पियरे यांनी म्हटले आहे की, अमेरिकन लोकांचे अपहरण आणि छळ हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही.

हा फोटो मॅटामोरोस सीमाचा आहे. जिथून अमेरिकन मेक्सिकोमध्ये घुसले.
हा फोटो मॅटामोरोस सीमाचा आहे. जिथून अमेरिकन मेक्सिकोमध्ये घुसले.

किडनॅपींग प्रकरणात आत्तापर्यंतचे अपडेट्स

  • एका मेक्सिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की, अपहरण झालेल्यांमध्ये एक महिला आणि तीन पुरुष आहेत.
  • मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, संपूर्ण सरकार अपहरण केलेल्या अमेरिकनांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • अपहरणाच्या वेळी एका मेक्सिकन व्यक्तीची हत्या झाल्याचीही माहिती मिळत आहे.
  • अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत आहे की, 4 अमेरिकन लोक चुकून अपहरणकर्त्यांचे बळी ठरले आहेत. त्याला वाटले की, ज्या पांढऱ्या व्हॅनमध्ये अमेरिकन प्रवास करत आहेत ती हॅटीच्या ड्रग्स तस्करांची आहे.
  • ज्या भागात अमेरिकनांचे अपहरण झाले तो भाग गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...