आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज:कामाच्या थकव्यामुळे अमेरिकन एकांतात घालवतात जास्त वेळ

जेसिका ग्रॉस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे अर्थतज्ज्ञ ब्राइस वॉर्ड वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहितात की, अमेरिकन लोक वेगळे राहणे पसंत करू लागले आहेत. २०१३ नंतर लोकांशी थेट संवाद साधण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. महामारीच्या खूप आधीपासून हे घडत होते. या घसरणीत सोशल मीडिया, राजकीय ध्रुवीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाची भूमिका आहे. सामाजिक जीवनातील घसरण ही चिंताजनक प्रवृत्ती असल्याचे ते म्हणतात. एक तज्ज्ञ म्हणून माझ्या मते हे खरे आहे की, अमेरिकन लोक आता मित्रांसोबत कमी वेळ घालवत आहेत, कारण ते खूप थकले आहेत.

त्याचा राजकीय ध्रुवीकरणाशी काहीही संबंध नाही. हे काळजी करण्यासारखेही नाही. ३५ ते ४४ वयोगटातील लोकांकडे वीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत मनोरंजनासाठी कमी वेळ आहे. लेबर ब्युरो डेटाच्या विश्लेषणात आढळून आले की, ३५ ते ४४ वयोगटातील अमेरिकन लोक २००३ पासून दररोज १६ मिनिटे कमी विश्रांती घेतात. कामाचा अतिरेक आणि घरातील सदस्यांची काळजी घेणे यामुळे असे झाले आहे. नवीन आकडेवारी दर्शवते की, ओईसीडी या श्रीमंत देशांच्या संघटनेत अमेरिकन दिवसातील सर्वाधिक तास काम करतात. अमेरिकेतही केंद्र सरकारच्या पातळीवर पगारी रजेची तरतूद नाही. आजारी पडणे किंवा प्रवासासाठीदेखील पगारी रजा नाही. माऊंट रॉयल युनिव्हर्सिटी कॅल्गरी येथील प्रोफेसर आणि सोशल मीडिया-फ्रेंडशिप या विषयावर संशोधक असलेल्या मेलिंडा देसजारलेस म्हणतात की, सोशल मीडियाच्या युगात ऑनलाइन आणि ऑफलाइन कम्युनिकेशनमध्ये खूप फरक आहे. आता आपण आभासी आणि वास्तविक जग यांच्यातील डिजिटल दुरावा कमी केला आहे.

मेलिंडा यांचे संशोधन सांगते की, इन्स्टंट मेसेजिंगसारख्या सामाजिक संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे अंतरंग माहितीच्या देवाणघेवाणीने मैत्री सुधारते. सोशल मीडियामुळे नातेसंबंध मजबूत होतात, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील आयटी सेंटरच्या प्रमुख संशोधक प्रोफेसर अॅलिस मारविक म्हणतात, आमचे संबंध इंटरनेटपुरते मर्यादित नाहीत.

बातम्या आणखी आहेत...