आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘माझा ३० वर्षांपासून फुलांच्या उद्योगाशी संबंध आहे, पण फुलांची एवढी टंचाई कधीही पाहिली नाही. लग्नसराई आणि व्हॅलेंटाइन डेसाठी मोठी मागणी असताना ही समस्या उद्भवली आहे...’ हे म्हणणे आहे अॅड लिब्बी इव्हेंट्स या अमेरिकी कंपनीचे पार्टनर बॉब कोंटी यांचे. कोंटींनी सांगितले, ‘देशभरातील फूल व्यावसायिक या समस्येचा सामना करत आहेत. अमेरिकेत या हंगामात २५ लाख विवाह होणार आहेत. पण लग्नात वापरली जाणारी पांढरी फुले आणि गुलाबच मिळत नाहीत. फुलांऐवजी आम्ही रोपे आणि मेणबत्त्या वापरत आहोत.’
न्यूयॉर्कमधील एचएमआर डिझाइनचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर ऋषी पटेल म्हणाले,‘जगभरात फुलांची टंचाई आहे. पांढऱ्या फुलांचे दर २५ ते ५०% पर्यंत वाढले आहेत. १२५ रुपयांचा गुलाब २५० रुपयांत मिळत आहे.’ कॅलिफोर्नियाच्या फ्लोरिस्ट ट्रेसी मॉरिस म्हणाल्या,‘शटडाऊन काळात अनेक लोकांनी व्यवसायात बदल केला. मजूर उपलब्ध नसल्यानेही फटका बसला आहे.’ अमेरिकेतील ११ राज्यांत व्यवसाय करणारे पॅट्रिक डॅल्सन यांच्या मते, ‘वाहतुकीची समस्या वाढली आहे. विमाने नसल्याने बाहेरूनही फुले मागवण्यात अडचण येत आहे.’
भारतात फुलांच्या दरात २०%पर्यंत वाढ, पण पुरवठ्यात अडचण नाही
इकडे, भारतात फुलांच्या पुरवठ्यात कुठलीही अडचण नाही. त्यामुळे लग्न समारंभांसाठीची मागणी सहज पूर्ण होत आहे. दिल्लीत फुलांच्या व्यवसायाशी संबंधित अर्जुनकुमार यांनी सांगितले की, फुलांचे दर २०% पर्यंत वाढले आहेत. बंगळुरूच्या बाहेरील भागात गुलाबाची रोज ४ ते ५ लाख फुले मिळत आहेत. ती मोठ्या संख्येत केआर मार्केटमध्ये विक्रीसाठी जातात. श्रीकांत बोलापल्ली यांनी सांगितले की, मजुरांच्या टंचाईमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे दरही वाढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.