आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेम्फिस शहरातील एका जुन्या कारखान्याजवळ माल उतरवण्यासाठी ट्रक चालक सहा तासांपासून रांगेत उभे आहेत. काही लोक आपली चोरी झालेली वाहने परत मिळण्याची वाट पाहत आहेत. आणि सुमारे २७०० गाड्या मैदानात ठेवण्यात आल्या आहेत. एवढ्या कार हा मेम्फिस आणि इतर अमेरिकन शहरांमध्ये वाहन चोरीच्या वाढत्या घटनांचा परिणाम आहे. किया आणि ह्युंदाई या दोन कंपन्यांच्या जास्त कार चोरीस गेल्या आहेत. यामुळे काही शहरांनी कंपन्यांविरुद्ध खटले दाखल केले आहेत. राज्याच्या अॅटर्नी जनरलने कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. गेल्या वर्षी मेम्फिसमध्ये ११,००० कार चोरीला गेल्या होत्या. २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहेत. यापैकी एकतृतीयांश किया आणि ह्युंदाईचे नवीन मॉडेल आहेत. ते उघडण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. कार अनलॉक होत असल्याच्या व्हिडिओंनी सोशल मीडिया तुडुंब भरला आहे. त्यासाठी फक्त एक स्क्रू ड्रायव्हर, यूएसबी कार्ड आणि हॉट वायरिंगची माहिती आवश्यक आहे. पोलिस म्हणतात, अनेक गुन्हेगार किशोरवयीन किंवा तरुण असतात. ते पिकनिक, दरोडे आणि इतर गुन्ह्यांसाठी या गाड्यांचा वापर करतात. मेम्फिसमध्ये कार चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या १७५ पैकी निम्म्याहून अधिक किशोरवयीन आहेत. कोरोना महामारीच्या काळात अमेरिकेतील शहरांमध्ये कार चोरीच्या घटना वाढल्या होत्या. क्रिमिनल जस्टिस ऑर्गनायझेशनच्या मते, २०२० आणि २०२१ मध्ये देशभरात काही गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. गेल्या वर्षी त्यात थोडी घट झाली होती. पण, ते महामारीच्या काळापेक्षा जास्त आहेत. गुन्हेगारी तज्ज्ञ म्हणतात, महामारीच्या सुरुवातीस वाहन चोरीचे प्रमाण वाढले, कारण लोक घरात होते. दिवसभरात कार्यालयांजवळील सुरक्षित पार्किंगऐवजी गाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्या. मात्र, चोरीचे प्रमाण वाढतच गेले. यामध्ये सोशल मीडिया व्हिडिओंचीही भूमिका आहे. व्हिडिओमध्ये किया व ह्युंदाई गाड्या कशा चोरायच्या हे दाखवले आहे. दक्षिण कोरियाच्या दोन्ही कारची अमेरिकेत लोकप्रियता वाढली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील एकूण वाहन विक्रीत त्यांचा वाटा १० टक्के होता. कंपन्यांनी नुकतीच विधाने जारी केली की, त्यांनी त्यांच्या नवीन मॉडेल्सची सहज चोरी होण्याची समस्या सोडवली आहे. ४५ लाख किया आणि ३८ लाख ह्यंुदाई कारमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. कंपन्यांनी त्यासोबत स्टीअरिंग व्हील लॉक अमेरिकेतील पोलिस विभागांना पाठवले आहेत. ज्यांच्या कारला चोरीचा धोका आहे अशा कार मालकांना हे मोफत दिले जातील. यूट्यूब आणि टिकटाॅकच्या प्रतिनिधींनी सांगितले की, त्यांनी किया चॅलेंज नावाचे अनेक व्हिडिओ काढून टाकले आहेत. यूट्यूबने म्हटले आहे की, ते काही व्हिडिओ शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक स्वरूपाचे असल्यास ते राहू देतील. सिएटल आणि कोलंबस शहरांनी कार उत्पादकांवर त्यांच्या कारवर चोरीविरोधी तंत्रज्ञान स्थापित न केल्याबद्दल खटला भरला आहे. मिनेसोटा राज्याचे अॅटर्नी जनरल कीथ एलिसन म्हणाले की, कंपन्यांनी त्यांच्या राज्याचे ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक शांतता पुनर्संचयित कायद्याचे उल्लंघन केले आहे का, याचा तपास करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.