आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 आशियाई महिला उद्योजकांमध्ये 3 भारतीय:‘सेल’ अध्यक्ष मंडल, एमक्युअर फार्माच्या थापर, होनासा कंझ्युमरच्या अलघ यांचा समावेश

सिंगापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोराेनाकाळात व्यवसाय वृद्धी, फोर्ब्जच्या यादीत सन्मान

फोर्ब्जच्या २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांना स्थान मिळाले आहे. यामध्ये स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) सोमा मंडल, एमक्युअर फार्माच्या व्यवस्थापकीय संचालक नमिता थापर आणि होनासा कंझ्युमरच्या सहसंस्थापक गजल अलघ यांचा समावेश आहे.

कोरोना काळातील तीन वर्षांमध्ये अनिश्चिततेच्या काळातही आपल्या व्यवसायाची वृद्धी आणि विस्तार करण्यात यशस्वी ठरलेल्या महिलांचा फोर्ब्जच्या नोव्हेंबर महिन्यातील अंकात प्रकाशित झालेल्या यादीत समावेश आहे. सोमा मंडल यांनी जानेवारी २०२१ मध्ये सेलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. ६०० कोटींची संपत्ती असलेल्या नमिता थापर एमक्युअर फार्मा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या संस्थापक-सीईओसुद्धा आहेत. गजल अलघ यांनी सन २०१६ मध्ये पती वरुण अलघ यांच्यासोबत होनासा कंझ्युमर कंपनीची स्थापना केली होती. विषारी पदार्थ मुक्त हा ब्रँड असल्याने सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा एफएमसीजी ब्रँड समजला जातो.

फोर्बजसच्या यादीत ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, चीन, तैवान, थायलंड येथील महिला उद्योजकांचाही समावेश आहे. या महिला जहाज बांधणी, रिअल इस्टेट, औषधी, तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत.

बातम्या आणखी आहेत...