आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये अलीकडे एक जाहिरात चर्चेत आहे. ‘एका तरुणाला रुग्णवाहिकेतून नेण्यापूर्वी आधी त्याला धक्का देऊन बेंचवर झाेपवले जाते व दुसऱ्या जाहिरातीत तरुणाला बेड्या घालून फिंगरप्रिंट्स घेताना पाेलिस त्यात दिसते.’ या आशयाच्या जाहिरातीसाेबत एक संदेशही आहे. ‘वाईट इराद्याने शहरात येणाऱ्यांनी दंड, रुग्णालयात राहणे आणि गुन्हेगारी रेकाॅर्डमध्ये आपले घालणे आणि आराेग्य बिघडवण्याची तयारी ठेवावी’ असे या संदेशात म्हटले आहे. स्टे अवे अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या इशाऱ्याचा उद्देश ब्रिटनहून येणाऱ्या १८-३५ वर्षीय पुरुष पर्यटकांना वीकेंडसाठी अॅमस्टरडॅमला येण्यापासून राेखणे असा आहे. हा तरुण वर्ग मद्य, गांजा, रेडलाइट भाग असल्याने अॅमस्टरडॅमकडे आकर्षित हाेताे. रस्ते मार्गे लंडनहून अॅमस्टरडॅमला येण्यासाठी सहा तास लागतात. अॅमस्टरडॅम शहराने आता आपली प्रतिमा सुंदर शहर अशी करण्याचा संकल्प केला आहे. शहराने उपद्रवी पर्यटकांना हुसकावण्याचे काम सुरू केले आहे. अॅमस्टरडॅमचे उपमहापाैर साेफयान बारकी म्हणाले, आमच्या शहरांत सर्वांचे स्वागत आहे. परंतु दुर्वर्तन व उपद्रव करणाऱ्यांना थारा नाही. अॅमस्टरडॅम महानगर आहे. शहराला लाइव्हली बनवण्यासाठी बेजबाबदार हाेण्यापेक्षा शिस्तीचा पर्याय निवडावा. सार्वजनिक ठिकाणी गदाराेळ, ड्रग्ज खरेदीसारखी कामे करू नये याबाबत व्हिडिआेमधून जागृतीचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसे आढल्यास १२,५०० रुपये दंड भरावा लागेल. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार २०२१ मध्ये सुमारे ९० लाख पर्यटकांनी एक रात्र काढण्यासाठी अॅमस्टरडॅमची निवड केली. २०१९ मध्ये ही संख्या २.२ काेटी हाेती. यंदा विक्रम माेडीत निघू शकताे. अॅमस्टरडॅमच्या कडक शिस्तीचे निश्चितपणे महत्त्व आहे. कारण वर्षाखेरीस नेदरलँड्ससह युराेपातील प्रमुख शहरांही हेच धाेरण लागू केले जाणार आहे. ब्रिटिश सरकारनेदेखील एका अभ्यासानंतर इशारा दिला आहे. सुटीच्या कालावधीत तरुण बाहेर जाऊन मद्यपान करू शकतात, असा अंदाज लावला आहे. दरवर्षी १०० हून जास्त समूहांची बॅचलर पार्टी आयाेजित करणारी संस्था लास्ट नाइट आॅफ फ्रीडमचे जाॅन्सन यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
परदेशी पर्यटकांना शहराची संस्कृती समजावून सांगण्याचा हा प्रयत्न
उपद्रवी पर्यटकांना राेखण्यासाठी शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून प्रयत्न करत हाेते. गेल्या महिन्यात रस्त्यावर गांजा घेण्यास प्रतिबंध व व्यवसायाला तीन तास अाधी, कॅफे-रेस्तराँदेखील रात्री २ वाजण्यापूर्वी बंद करण्याचे आदेश दिले गेले. स्टे अवे अभियान त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांनी स्थानिक संस्कृती समजून घेतील अशी अपेक्षा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.